अत्यंत दुर्दैवी! ….म्हणून पत्नी अन् मुलासमोर शेतकऱ्याने विष पिऊन संपवलं जीवन

अत्यंत दुर्दैवी! ….म्हणून पत्नी अन् मुलासमोर शेतकऱ्याने विष पिऊन संपवलं जीवन 

पंढरपूर प्रांत कार्यालयात कामाच्या निमित्ताने आलेल्या एका तरुण शेतकऱ्याने काम होत नसल्याच्या नैराश्येतून विष प्राशन करून आपल जीवन संपवलं आहे.

ही घटना आज दुपारी घडली. अक्षय काळे (रा . देवडे ता.पंढरपूर) असे विष प्राशन केलेल्या तरूणाचे नाव आहे. अक्षय काळे आपली पत्नी आणि लहान मुलासह येथील प्रांत कार्यालयात कामाच्या निमित्ताने आला होता.

वारंवार हेलपाटे मारून ही काम होत नसल्याने पत्नी समोरच त्याने‌ टोकाचं पाऊल‌ उचलले आहे. अक्षय काळे याची मोहोळ तालुक्यातील शेज बाभूळगाव येथे शेती आहे. त्याच्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने शेती विकायला काढली. 

विक्री करण्यासाठी त्याने प्रांत कार्यालयात परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. परंतु शेत जमिनीची परवानगी मिळत नसल्याने आज त्याने  गोचीड मारण्याचे विषारी औषध प्राशन करून टोकाचं पाऊल‌ उचललं आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line