क्राइमपुणेमहाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला! म्हणून वडिलांसह कुटुंबातील 7 जणांनी केली आत्महत्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

महाराष्ट्र हादरला! म्हणून वडिलांसह कुटुंबातील 7 जणांनी केली आत्महत्या 

मुलाने मुलगी पळवून नेल्याच्या रागात वडिलांसह कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पती, पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह 3 मुलांचे मृतदेह भीमा नदीत सापडले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये ही घडना घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर दौंड शहरात खळबळ उडाली आहे.

मयताच्या मुलाने मुलगी पळवून नेली होती. त्याने मुलगी परत केली नस ल्याने वडिलांसह अन्य 6 जणांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुटुंबाने भीमा नदीत आत्महत्या केली. पती-पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह त्यांच्या 3 मुलींचे मृतदेह भीमा नदीत सापडले होते. त्यावेळी घातपात की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला होता. पोलीस चौकशीनंतर आत्महत्या असल्याचं समोर आलं आहे. 17 जानेवारीच्या रात्री 7 जणांनी भीमा नदीत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी यातील चार मृत व्यक्तींची नावे आहेत. हे कुटुंब मंगळवारी 17 जानेवारी रोजी रात्री अकरानंतर वाहनाने निघोज या गावातून निघाले होते. शिरूर – चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतदेह आढळून आले होते. 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 20, 21 आणि 22 जानेवारी रोजी तीन मृतदेह आढळून आले होते. या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

litsbros

Comment here