क्राइम

तरुणाची स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या; आठचं महिन्यापूर्वी झाले होते लग्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तरुणाची स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या; आठचं महिन्यापूर्वी झाले होते लग्न

 पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 26 वर्षीय तरुणानं प्रेम प्रकरणातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. डिसेंबर 2021 मध्ये या तरुणाचं लग्न झालं होतं. विशाल राजेंद्र तोडकर (वय 26, रा. भागीरथीनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

 विशाल हा कपड्याचा व्यासायिक होता. पुणे शहरात त्याची कपड्याची दुकाने आहेत. डिसेंबर 2021 मध्ये त्याचे लग्न झाले होते. सध्या तो हडपसर परिसरात पत्नी आणि आई सोबत राहत होता. प्राथमिक माहितीनुसार विशाल याचे एका तरुणी सोबत प्रेम संबंध होते. याच कारणावरून मागील काही दिवसांपासून त्याचे घरात वाद होत होते. यामुळे पत्नीही माहेरी निघून गेली होती. दरम्यान पत्नी माहेरी गेल्यामुळे तो मागील काही दिवसांपासून नैराशात होता. 


दरम्यान रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने स्वतःवर गावठी पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. आज सकाळी तो फोन उचलत नसल्याने कुटुंबीयांनी घरी येऊन पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेत जीवन संपवले होते.

घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, विशालकडे गावठी पिस्तूल कोठून आले. त्याबाबत त्याच्या कुटूंबाकडे व मित्रांकडे विचारपूस केली जात आहे, परंतु, त्याबाबत कोणालाच माहिती नसल्याचे समोर आले आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

litsbros

Comment here