**दरातील चढ-उतारामुळे कांदा उत्पादक हतबल*
केत्तूर ( अभय माने) केंद्र सरकारचा कांदा निर्यातीबाबतच्या चुकीच्या धोरणाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे कांद्याचे भाव सध्या कमी-जास्त होत असल्यामुळे याचा फटका कांदा उत्पादकांना बसला आहे सिजनमध्ये 80 उच्चाकी रुपये किलो दराने विकला गेलेला कांदा सध्या 10 ते 30 रुपये किलो दराने विकला जात आहे.
गतवर्षी कांद्याचे भाव वाढल्याने कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारने निर्यातीवर 40 % कर आकारला होता त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी इतर पिकांना फाटा देऊन कांदा पीक घेण्याकडे आपला मोर्चा वळविला होता. आता नवीन कांदा बाजारात दाखल होत असल्याने डिसेंबर महिन्यापासून कांद्याची आवक वाढली आहे त्यामुळे कांद्याच्या दारात घसरन सुरु असून सध्या कांदाचे बाजारभाव 10 ते 30 रुपये किलो दरावर आला आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना झालेला खर्चही निघत नसल्याने येथील याचा मोठा फटका कांदा उत्पादकांना बसत आहे.
नेताजी सुभाष विद्यालय केतुर २ येथे स्वामी विवेकानंद क्रीडा सप्ताहाला सुरुवात
ग्रामीण भागातील आठवडे बाजारात कांद्याचे दर 15 ते 20 रुपये किलो असे झाले आहेत.यामुळे केंद्रसरकरने बाहेरील कांदा निर्यात बंद करावी व कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकर्यांमधून होत आहे.