आम्ही साहित्यिकपुणेमहाराष्ट्र

*** सुगरण पक्षी…एक सिविल इंजिनियर ***

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

*** सुगरण पक्षी…एक सिविल इंजिनियर ***
………………………………………..
आता बघा तसं बघायला गेलं तर प्रत्येक गोष्ट…घटना किंवा वस्तू या प्रत्येकाच्या मागं काही ना काही इतिहास दडलेला असतो पण आपण तो चाणाक्षपणे अवलोकन करीत नसल्यामुळे तो इतिहास इतिहासातच राहतो त्याची उकल होत नाही तसंच झाडाझुडपांचं पण आहे जीवजंतू च पण असंच असतंय बघा आता बघा काहींना तर धार्मिक महत्व प्राप्त झालयं नव्हे ही त्यांची ओळखच निर्माण झालीयं आता आपण या लेखांमध्ये एक निसर्गनिर्मित सिव्हिल इंजिनियर सुगरण पक्षी व धार्मिकतेचं प्रतीक उंबराचे झाड याबद्दल जरा विचार करू निसर्ग किती महान आहे बघा कोणत्याही झाडाची लागवड त्यांची ठेवण मशागत करावी लागते किंबहुना जंगली झाडांचा विचार केला तर माती पाणी व आवश्यक नैसर्गिक वातावरण पोषक असावं लागतं पण एक चाफा असं झाड आहे नव्हे मी बारकाईनं निरीक्षण केलं तर वरीलपैकी एक सुद्धा नैसर्गिक सुविधा व सोय याला उपलब्ध नाही त्यासाठी माती नाही…मशागत नाही… आहो एवढेच काय आपण ज्याला आपला आपला म्हणतो त्या पानांनी पण साथ सोडली पण पट्ट्यानं बहरणं सोडलं नाही खडकाच्या फटीतून निर्मिती…

एवढी निसर्गाची किमया आता आपण जरा इतर झाडांविषयी बघू हे बघा वड…पिंपळ… कडुनिंब… उंबर… दुर्वा… आघाडा…रुई… बेल…ही धार्मिकतेची प्रतीकं असलेली झाडं अशी कितीतरी झाडं निसर्गामध्ये अस्तित्वात आहे त्यापैकी उंबराच झाड हे साक्षात श्री गुरुदेव दत्ताचे प्रतीक मानलं जातं कारण आपल्याला सहज दृष्टीस पडणारा आसमंतातला घटक म्हणजे उंबराच झाड कल्पवृक्ष मानल्या गेलेल्या उंबराला आपल्याकडं धार्मिक महत्त्व फार आहे तसंच आसमंतातल्या लक्ष वेधून घेणारा आणखी एक घटक म्हणजे सुगरण पक्षी एकीकडं अजाण वृक्षांची नाळ ज्ञानदेवाशी जोडली गेली आणि इकडं अजून एक असाच वृक्ष जनमानसामध्ये पूजनीय बहुतांश दत्त मंदिर परिसरात आढळणारे उंबर उर्फ औदुंबर कुठेही दिसला कि मन लगेच श्री दत्त प्रभू कडे धाव घेतं
शंभर टक्के भारतीय असणारा हा वृक्ष आणि हा वृक्ष माहिती नसलेली व्यक्ती विरळाच जळामध्ये पाय सोडून बसलेला औदुंबर असो किंवा अगदी उंबराच फुल झालाय असं उल्लेखून घेणारा उंबर असो झाडाभोवती शास्त्रीय माहितीपेक्षा धार्मिकता व कल्पनाविलास जास्त गुंफलेला आहे.

आजन्म सदापर्णी राहणार हे झाड जनजीवनाशी विविध प्रकारे जोडलयं 15 मीटर पर्यंत उंची गाठणारे हे औदुंबर स्थानिक वृक्षसंपदा व जैवसाखळी चा उत्कृष्ट नमुना म्हणता येऊ शकतो उंबराचं फुल म्हणजे अतिशय दुर्मिळ गोष्ट असा एक समज आपल्याकडे पक्का झाला आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की उंबराचे फूल वेगळं असं काही नसतं उंबराला फळे येतात ती वास्तविक फुलचं असतात या अनेक फुलांच्या गुच्छावर एक पातळ आवरण असतं आणि त्या आवरणाने झाकलेल्या गुच्छाला आपण उंबर म्हणतो वड पिंपळ या कुळातील वृक्षांना परागीभवन करताना स्वतःचा असा फ्लाय वास्प म्हणजेच उडणाऱ्या माशीसारखा अगदी लहान किटक असतो उंबराची स्वतःची एक वास्प आहे जी परागीभवनाची प्रक्रिया करते या आवरणाने झाकलेल्या फुलाचे परागीभवन होण्यासाठी त्याच्या देठाजवळ एक लहानसं चित्र असतं यातून हा कीटक आत शिरत असतो तेथेच मिलन करून अंडी घालतो म्हणून कित्येक वेळा उंबर फोडून पाहिल्यावर आपल्याला आत मध्ये आळ्या दिसतात निसर्गातील एक अद्भुत अशी साखळी येथे दिसून येते या कीटकांना उंबराखेरीज जगता येत नाही दीर्घायुषी उंबराचे झाड म्हणजे जणू कल्पवृक्षच म्हणावा लागेल याची पानं ही जवळून पाहिली तर त्यावर गाठी दिसतात या गाठी मध्ये एक कीटक लहानाचा मोठा होतो पूर्ण वाढ झालेला कीटक ही गाठ फोडून बाहेर येतो.

उंबराची फळे खाऊन पक्षांच्या हजारो पिढ्या सुखाने नांदल्या आहेत उंबराच्या बिया पक्षांच्या पोटात जाऊन त्यांच्या विष्टे द्वारे पुन्हा बीजांकुरण होते तेथेच त्या रुजायला लागतात समृद्ध जिव साखळीचं हे एक प्रतीक आहे जंगलात ही फळं खाऊन क्षुधा शांती करणारे बरेच प्राणी पक्षी आहेत उंबर आणि त्याचा आयुर्वेदिक वापर यावर कितीतरी लेख उपलब्ध आहेत पण आपला काय त्यो अभ्यास नसल्यामुळे नाही बोललेलं बरं उंबराची फळं लाकूड अशा सर्व भागांचा उपयोग आपल्याला माहिती आहे तसं पाहायला गेलं तर पूर्वीसारखा रोज आपला आणि उंबराचा संबंध कमी व्हायला लागलाय
पण एवढं मात्र खरे कारण हल्लीच्या आधुनिक घरांना बहुतेक उंबरठाच नसतो हा उंबरा कायम लाकडाचा असायचा या लाकडाला किड लागत नाही आणि ते कुजत किंवा तुटत नाही म्हणून दारासाठी उंबऱ्याचं लाकूड वापरलं जायचं ते उंबराच लाकूड उंबर आणि उंबरठा कुठेतरी आपल्या घरच्याशी जोडलेलं नातं आहे आता बघा घरटं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो सुगरण पक्षी कारण या निसर्गातील प्रत्येक प्राणी पक्षी आपलं जीवन व्यतीत करण्यासाठी आपापल्या परीने घराचं गुहा… वारूळ…ढोली… घरटं… खोपा…वगैरे तयार करत असतो कारण उंबराचा आणि या घरट्यांचा गप्पा मारण्याच्या ओघात आमच्या कॉलनीच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतोडीतून पक्ष्यांचा किलबिलाट आणि भांडणाचा आवाज कानावर आला जराशी थोडं जवळ जाऊन पाहिलं तर सुगरण पक्षी मंडळ घरटी बनवून जोडी जुळवायच्या गडबडीत होते आजूबाजूला जाणारे-येणारे यांच्या मनात काही आलं नसेल पण मला शाळेतल्या मराठीच्या पुस्तकात चक्कर मारून आल्यावाणी वाटलं कारण शाळेत सातवीत असताना शिकलेली बहिणाबाईंची जगप्रसिद्ध कविता खोपा आठवली अशिक्षित म्हणविणार्‍या बहिणाबाईंचे निरीक्षण किती अचूक आणि जबरदस्त होतं हे सुगरणीचं घरटं बनवताना बघितल्यावर जाणवतं ही कविता जरी ग्रामीण निसर्गाशी निगडित असली तरी त्यातल्या शास्त्रीय गोष्टीकडे जरा पाहू या कवितेतल्या बाया म्हणजे मादी पक्षी ते कधीच खोपा बनवत नाही हे काम नर पक्षावर सोपवते.

साधारण पावसाळा सुरू झाला म्हणजे मादी पक्षांचा प्रजननाचा हंगाम समजला जातो पाणवठ्याजवळ उंच काटेरी झाडावर नर पक्षी घरटे बनवायला सुरुवात करतात वरून निमुळते मध्यभागी गोलाकार आकाराची घरटी हे अगोदरच बनवून ठेवतात मग आपल्या पंखांनी फटर-फटर आवाज काढून माद्यांना बोलावतात मग त्या त्यांच्या बाया येतात आणि त्या अर्धवट बांधलेल्या त्या घरट्याचे त्यांच्या परीने निरीक्षण करतात घर पसंत पडलं तर त्या नराबरोबर जोडी जमवतात एकदा का बयानं होकार दिला कि नर पक्षी ते घरटं पूर्णत्वाला नेण्याचं काम करतो साधारण 8 सेंटिमीटर लांबीची गवताची दोरी ओढून आणतात साधारण दीड-दोन फूट लांबीचं घरटं बनवायला नराला साधारण वीस दिवसापर्यंत कालावधी लागतो त्यासाठी साधारणपणे तो 500 खेपा मारतो घरटं विणकाम करायला स्वतःच्या चोचीचा वापर करतो या घरट्याचा आकार मध्यभागी फुगीर असतो जिथे अंडी पिल्ली राहतात वाऱ्याने हलकं घर हलून खाली पडू नये यासाठी नर आपल्या चोचीने चिखलाचे बारीक गोळे करून विणलेल्या घराच्या आतून लावतात त्या वजनाने घरटं थोडसं वजनदार बनतं हेलकावे खात नाही किती विचार करतात ना हे पक्षी…
आता नर हे दक्षिण पश्चिमेच्या दिशेने घरटी करतात म्हणजे मान्सून परतीचा त्यांना त्रास होत नाही निसर्गाने दिलेली चतुरस्त्र बुद्धी नर घरटी बनवताना वापरतात नेहमी काटेरी झाड..पामच्या झाडावर… किंवा पाणवठ्यावर… ही घरटी बनवली जातात अशाने भक्षकांचा त्रास घरट्याला होत नाही तरुण नवथर नर हे पाणथळीच्या जागी घरटं बनवायचा सराव करतात सरावाने सफाईदारपणे बनवलेल्या घरट्यात मादी दोन ते चार पांढरट रंगाची अंडी घालते ही अंडी घातल्यावर साधारण आठ-दहा दिवसांनी अंड्यातून पिल्लू बाहेर येतं मग सुरू होतं मादी सुगरणीचं काम…
ही मादी सुगरण पिलांच्या खान पाण्याकडे लक्ष देते नर पक्षी क्वचितच पिलांना भरवतो एकदा घर बनवून पिलांना जन्म दिल्यावर नर पक्षी ते पूर्वीची अर्धवट राहिलेली घरटी पूर्ण करतो व पुन्हा एक बंगला बने न्यारा असं गीत गायल्या प्रमाणे नवीन माद्यांच्या शोधामध्ये मागे लागतात तर इकडे ढालगज मादीही काही कमी नाही एकाच्या घरात दुसऱ्याची पिल्लं असला प्रकार चालतो कित्येकांनी नुसता खोपा पाहिलेला असतो पण पक्षी पाहिलेला नसतो एकाच झाडावर सहा सात खोपे…काय नजारा दिसत असेल.

हेही वाचा – सोशल मिडीयावर चढाओढ.. “काय झाडी…काय डोंगार… काय हाटील… सगळ कसं ओक्के…”

धक्कादायक घटना- चिमुकल्या मुलासह विवाहितेची जाळून घेऊन आत्महत्या; करमाळा तालुक्यातील गौंडरे येथील घटना

पित्याने एवढ्या मेहनतीने बनवलेल्या घरट्यामध्ये पिल्लू जास्त दिवस राहत नाही जन्मानंतर 18 ते 20 दिवस राहून भुर्रकन उडून जातं खरंच सध्याच्या गगनचुंबी इमारती बांधताना किती काळजी घेतली जाते या घरात किती तरी वर्ष राहायचं म्हणून मजबुती सोयी अशा गोष्टी आपण पाहतो काय काय नवीन बांधकाम पद्धती निघाल्यात आता दिवाणखान्याला किंवा खिडकीला लटकवण्यासाठी खास करून सुगरणीचा खोपा आणला जातो अगदी अशाच पद्धतीने सुतार पक्षी चोचीने आपल्या झाडाच्या ढोलीत बेमालूमपणे वाकसानी लाकुड कातरल्यासारखं कातरून सुंदर घर बनवतो… मातीचा एक एक कण जमा करून रांग न मोडता एका रांगेत सगळी वाहतूक करून मुंगी वारूळ बनवते…कावळा पण बाभळीच्या काटेरी काड्या बेमालूमपणे एकात एक अडकवून छानसे घरटं करतो…एवढेच काय कुंभारीण सुद्धा छोट्याशा कोनाड्यात ओल्या मातीच्या चिखलापासून आपलं पोळं बनवते… ती कुठं चिखल तयार करीत असेल आणताना प्रत्येक खेपेस किती ग्रॅम चिखल आणीत असेल बरं…सारं काही निसर्गाची किमया…आणि म्हणून यांना एक निसर्गाचा सिविल इंजिनियर म्हणावं लागेल कुठं शिकली असतील एव्हढी कला…कुठे केला असेल हा डिप्लोमा…
**************************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros

Comment here