उपळाईतील नंदिकेश्वर विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ संपन्न

उपळाईतील नंदिकेश्वर विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ संपन्न 

माढा प्रतिनिधी – उपळाई बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नंदिकेश्वर विद्यालयात अनिवासी रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.यावेळी माढा बीटचे विस्ताराधिकारी तथा उपळाई बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख श्री दिगंबरजी काळे साहेब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भैरवनाथ विद्यालय अंकोलीचे उपक्रमशील शिक्षक श्री हनुमंत राऊत सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दशरथ देशमुख साहेब यांनी केले.

हेही वाचा – बालचमुंच्या कलाविष्काराने पोफळजकर मंत्रमुग्ध…… यशकल्याणी सेवाभावी संस्थेकडून शाळेला बावीस हजारांची मदत तर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके प्रदान

‘जग बदलणारा बापमाणूस’ ग्रंथास ‘नेल्सन मंडेला पुरस्कार’ ; आर्यवृत्त विद्यापीठ त्रिपुराचे कुलगुरू डॉ. प्रकाश करमाडकर यांच्या हस्ते लेखक जगदीश ओहोळ यांचा झाला सन्मान!

गुरुकुल प्रकल्पांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.त्यांना बक्षीस म्हणून प्रमाणपत्र व कंपास,क्वायर वही, पेन असे शालेय उपयोगी साहित्य देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाची ज्येष्ठ शिक्षक श्री नागेश बोबे सर,विद्यालयाचे गुरुकुल विभागप्रमुख श्री शब्बीर तांबोळी सर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.श्री शब्बीर तांबोळी सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.

karmalamadhanews24: