फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प

फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प

केत्तूर (अभय माने) विद्यार्थ्यांनी मनावर घेतले तर नक्कीच बदल घडतो त्यामुळे येणाऱ्या दिवाळीत वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी फटाके विरहित,प्रदूषण मुक्त व पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प नेताजी सुभाष विद्यालय, व जुनिअर कॉलेज केत्तूर (ता.करमाळा) येथील विद्यार्थ्यांनी केला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य काशिनाथ जाधव म्हणाले की, प्रदूषण मुक्त वातावरणात जगण्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया तर पर्यावरणप्रेमी शिक्षक किशोर जाधवर म्हणाले की,फटाके वाजवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत असते त्यामुळे पर्यावरणासह पशुपक्षी,मनुष्यप्राणी यांची हानी होते त्यासाठी फटाके वाजवू नयेत.

हेही वाचा – महाफीड कंपनीकडून संगम शाळेस रंगरंगोटी व बोलक्या भिंती करण्यासाठी मदतनिधी

प्रवासी सेवा संघाकडून विविध मागण्यांचे निवेदन:नव्याने सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यासह इतर मागण्या

या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक भीमराव बुरटे यांचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक रामचंद्र मदने यांनी केले तर आभार सुभाष सामंत यांनी मानले.

छायाचित्र – केत्तूर (ता.करमाळा):फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करताना विद्यार्थीवर्ग

karmalamadhanews24: