श्रीमती शगुप्ता हुंडेकरी राज्यस्तरीय क्रांतिज्योती पुरस्काराने पुणे येथे सन्मानित

श्रीमती शगुप्ता हुंडेकरी राज्यस्तरीय क्रांतिज्योती पुरस्काराने पुणे येथे सन्मानित

करमाळा (प्रतिनिधी-अलीम शेख);
परिवर्तन सामाजिक संस्था व जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार पोथरे शाळेच्या आदर्श आणि उपक्रमशील शिक्षिका श्रीम. शगुफ्ता हुंडेकरी (शेख) यांना प्रसिद्ध सिने -अभिनेते किरण माने यांच्या हस्ते सन्मानपूर्वक आज प्रदान करण्यात आला.

हा सोहळा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पुणे येथे मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी इतिहास संशोधक व प्रसिद्ध शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे सर , समाजकल्याण चे सहा. आयुक्त विशाल लोंढे , महाराष्ट्र टाईम्स व बीबीसी दिल्ली मराठी विभागाचे प्रमुख अभिजीत कांबळे , साहित्यक तथा कार्यक्रमाचे आयोजक जगदीश ओहोळ हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

सौ. शगुफ्ता शेख या एक उपक्रमशील शिक्षिका असून त्या एक संवेदनशील लेखिका व उत्कृष्ट कवयित्री देखील आहेत. आपल्या सेवेच्या माध्यमातून केवळ शैक्षणिक विकास न साधता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून अष्टपैलू विद्यार्थी घडवून माझे विद्यार्थी तथा देशाची भावी पिढी एक आदर्श नागरिक बनेल यादृष्टीने त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो .


हेही वाचा – हिवाळ्यातच उजनीने गाठला तळ ; शेतकऱ्यांसह सर्वांचीच वाढली चिंता

३७ वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा महात्मा गांधी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

हा उल्लेखनीय राज्यस्तरिय पुरस्कार मिळाल्याबद्दल करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. राजकुमार पाटील साहेब, गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत साहेब, विस्तार अधिकारी श्री. सुग्रीव नीळ साहेब व जयवंत नलवडे साहेब , केंद्रप्रमुख श्री. निशांत खारगे सर, मुख्याध्यापक श्री. गजेंद्र गुरव सर, सर्व शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संतोष साळुंके , सर्व सदस्य, ग्रामस्थ व पालकवर्ग यांनी विशेष अभिनंदन केले आहे .

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line