उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयात क्रीडा सप्ताह संपन्न

उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयात क्रीडा सप्ताह संपन्न

माढा प्रतिनिधी – माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नंदिकेश्वर विद्यालयामध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोळाफेक,थाळीफेक,100 मी धावणे,200 मी धावणे व 400 मी धावणे इत्यादी मैदानी स्पर्धांमध्ये तसेच क्रिकेट या सांघिक खेळामध्ये पाचवी ते दहावीच्या सर्व वर्गांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.


या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन उपळाई बुद्रुक च्या सरपंच सौ.सुमनताई माळी मॅडम,स्कूल कमिटीचे सदस्य श्री कृष्णा घाडगे,सेवानिवृत्त मेजर श्री बाळासाहेब नागटिळक,श्री विनोद वाकडे, रासपचे जिल्हा संपर्कप्रमुख श्री गोरख वाकडे,उपळाई बुद्रुकचे माजी उपसरपंच श्री बसवराज आखाडे,श्री किरण शेंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

हेही वाचा – जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाला ‘लोकराजा शाहू पुरस्कार’ ; इचलकरंजी येथे झाला सन्मान

पद्मश्री आनंद कुमार यांनी केला प्रा. गणेश करे पाटील यांच्या कार्याचा गौरव

याप्रसंगी गतवर्षी व यावर्षी जिल्हा,विभाग व राज्यस्तरवर विद्यालयाचे नेतृत्व केलेल्या सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक श्री शब्बीर तांबोळी सर यांचे सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले.यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री नागेश बोबे सर,श्री दिगंबर माळी,श्री दत्तात्रय राऊत,उपळाई बुद्रुकचे पोस्टमास्तर श्री मनोजकुमार शेटे,श्री अतुल क्षीरसागर सर,श्री अंकुश घोडके सर,श्री मकरंद रिकिबे सर,श्री महेश वेळापुरे सर,श्री बप्पासाहेब यादव सर,श्री अविनाश नारनाळे सर,श्री केशव गायकवाड सर,श्री सुमित काटे सर,श्री योगेश धस सर,श्री शरद त्रिंबके सर,सौ. शिल्पा खताळ मॅडम,श्रीम.सुनिता बिडवे मॅडम,कु.ऐश्वर्या फडतरे मॅडम,सौ.अनुराधा जाधव मॅडम,श्री राजशेखर हत्ताळे,गणेश जाधव आदी उपस्थित होते.

karmalamadhanews24: