धार्मिकसोलापूर जिल्हा

बकरी ईदसाठी अधिकृत कत्तलखान्याचा वापर करा- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बकरी ईदसाठी अधिकृत कत्तलखान्याचा वापर करा
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

सोलापूर : यावर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हा सण एकाच दिवशी म्हणजे 10 जुलै 2022 रोजी आहे. मुस्लिम बंधुनी कुर्बानीसाठी अधिकृत कत्तलखान्याचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.


बकरी ईद समन्वय समितीच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एन.ए. सोनवणे, पशुधन विकास अधिकारी नवनाथ नरळे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत, जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंध समितीचे सदस्य केतन शहा, वनरक्षक जी.एस.चोपडे, प्रदूषण नियंत्रणचे किरण चव्हाण, नपा प्रतिनिधी आदी उपस्थित होते.


श्री. शंभरकर यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने अधिकृत कत्तलखान्याव्यतिरिक्त पशुंची कत्तल करू नये, असे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे सर्वांनी पालन करावे. मनपा, नगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कुर्बानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पंढरपूर, अकलूज, मंगळवेढा परिसरातील नागरिक हे 12 जुलैला घरगुती पद्धतीने ईद साजरी करणार आहेत. त्यापद्धतीने इतरांनी करावे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस, परिवहन, पशुसंवर्धन विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत सुधारित अधिनियमाप्रमाणे गाई, वळू किंवा बैल यांची कत्तल करणे, कत्तलीसाठी वाहतूक व निर्यात करणे प्रतिबंध आहे. वाहतूक प्रमाणपत्र असणे आवश्यक असून वाहतूक होणाऱ्या जनावरांचे वाहतुकीपूर्व स्वास्थ्य तपासणी विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देणे गरजेचे असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

litsbros

Comment here