सोलापूर जिल्हा

‘सोलापूर ते द्वारका’ नवी रेल्वे सुरु करण्याची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

‘सोलापूर ते द्वारका’ नवी रेल्वे सुरु करण्याची मागणी

सोलापूर —

सोलापूर जिल्हा हा अध्यात्मिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर (श्री विठ्ठल) व गुजरात (श्रीकृष्ण) येथील द्वारका या दोन्ही वैष्णव पंथातील तीर्थ स्थळांना जोडण्यासाठी नवी रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली. या रेल्वेमुळे परिसरातील भक्तगण, प्रवाश्यांना सोय होणार आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी या मागणीसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले. सोलापूर- द्वारका रेल्वेसेवेमुळे अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूरसह परिसरातील प्रवाश्यांना, भाविकांना मोठी सोया होणार आहे. वारीनिमित्त लाखो भाविक पंढरपूरला येतात.

त्यामुळे पंढरपूर – द्वारका या दोन्ही धार्मिक तीर्थस्थळांना जाणाऱ्या भाविकांना सोया होणार आहे. आठवड्यातून एक दिवस हि रेल्वे सेवा उपलब्ध होण्याची मागणी खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली.

विशेषतः या रेल्वेसेवेचा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच गुजरात राज्यातील लाखो प्रवाश्यांना सुविधा, लाभ होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हि नवी रेल्वेसेवा सुरु करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले. लवकरच हि मागणी पूर्ण होईल अशी आशा खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी व्यक्त केली.

litsbros

Comment here