क्राइमसोलापूर जिल्हा

धक्कादायक! पोटच्या पोराने घेतला जन्मदात्या पित्याचा जीव 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक! पोटच्या पोराने घेतला जन्मदात्या पित्याचा जीव 

पाण्याची टाकी देण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या मुलाने जन्मदात्या पित्याला बेल्टने मारहाण केली, या मारहाणीत ९२ वर्षीय वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापूरात  घडली आहे. दगडू कोकणे असं मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे.

या प्रकरणी दत्तकपुत्र मालू दगडू कोकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी आणि मृत पित्याचा सख्खा मुलगा शेकुंबर दगडू कोकणे आणि सुजाता शेकुंबर कोकणे या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दगडू हे पत्नीसोबत गांधीनगर झोपडपट्टीत राहत होते. तेथे दहा बाय दहाची त्यांची रूम होती. त्या रूमवरून आरोपी शेकुंबर आणि त्याची पत्नी नेहमी दोघांना त्रास देत होते. आरोपींनी दगडू यांच्याकडे येऊन पिण्याच्या पाण्याच्या टाकीची मागणी केली. त्यानंतर वडील दगडू आणि आई सुंदराबाई यांनी टाकी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.
शेकुंबर याने कंबरपट्ट्याने दगडू यांना मारहाण केली तर आरोपी सुजाताने सुंदराबाई यांचा गळा दाबला. त्यांना या दोघांच्या तावडीतून त्यांच्या ओळखीतील इसमाने एमआयडीसी पोलीस ठाणे येथे आणले. त्यानंतर ही घटना दगडू आणि सुंदराबाई यांनी दत्तकपुत्र मालू यांना सांगितली.यावेळी दगडू यांची स्थिती चिंताजनक होती.

त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची स्थिती गंभीर झाल्यानंतर रात्री उशीरा डॉक्टरांनी दगडू यांना मयत घोषित केले. याप्रकरणी दोन्ही आरोपींना रात्री उशीरा अटक करण्यात आली.याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, मयत दगडू आणि सुंदराबाई यांचे मूल जगत नव्हते. यामुळे त्यांनी मालू यांना दत्तक घेतले होते. दत्तक घेतल्यानंतर त्यांना तीन मुली आणि एक मुलगा झाला, आणि आता जन्मदात्या बापाचाच मुलाने जीव घेतल्याने सोलापुरात आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

litsbros

Comment here