क्राइमसोलापूर जिल्हा

सुपारी देऊन बापाने केला पोटच्या पोराचा गेम; पाच जणांना ठोकल्या बेड्या; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सुपारी देऊन बापाने केला पोटच्या पोराचा गेम; पाच जणांना ठोकल्या बेड्या; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

सांगोला(प्रतिनिधी): बापाने पोटच्या मुलास मारण्याची सुपारी देऊन त्यास यमसदनी
धाडल्याची धक्कादायक घटना सांगोला तालुक्यात उघडकीस आली आहे. मयत विजय विलास सरगर वय २१ रा. कवलापूर ता. मिरज जि. सांगली याचा खून केल्याप्रकरणी वडील विलास बाबू सरगर (वय ४५,) उत्तम महादेव मदने (वय २७ सध्या रा. डेरवली, राम मंदिराजवळ),
माऊली सदन, उरण पनवेल मूळ रा. लक्ष्मीनगर सांगली, प्रकाश गोरख कोळेकर वय २४, संतोष विठ्ठल पांढरे वय २६ राहणार, वैभव
तानाजी आलदर वय १९ तिघेही रा.कराडवाडी, कोळा ता.सांगोला यांना पोलिसांनी अटक केली.

आरोपींना प्रथम वर्ग
न्यायदंडाधिकारी श्रीमती देशमुख सांगोला कोर्ट यांच्या न्यायालयात उभे केले असता त्यांना एक ऑगस्ट पर्यंत
पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिली. याबाबत अधिक
माहिती अशी १५ जुलै रोजी बुद्धेहाळ ता. सांगोला येथील तलावात एका अनोळखी इसमाचा डोके नसलेला
मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिस पाटील सोपान गडदे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. डोके
नसलेला मृतदेह शेडनेटमध्ये दोरीने दगड बांधून गौडवाडी शिवारातील बुद्धेहेळ तलावाच्या पाण्यात फेकून
दिला होता.

सदर गुन्ह्याचा तपास
करत असताना पोलिसांनी सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस
पथके पाठवले होती. तपासादरम्यान सांगली पोलिसांनी विलास बाबू सरगर (वय ४५ रा.कवलापूर ता. मिरज जि.सांगली) या संशयित इसमास ताब्यात घेऊन सांगोला पोलिसांच्या ताब्यात दिले.

त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी करून केली असता त्याने सुपारी देऊन मुलाचा खून केला असल्याचे कबूल केले. पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी उत्तम महादेव मदने, प्रकाश

सदर गुन्ह्याचा तपास पोलिस
अधीक्षक श्रीमती तेजस्वी
सातपुते, अप्पर पोलीस
अधीक्षक अतुल झेंडे
उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक
पोलिस निरीक्षक प्रशांत हुले हे करत असून त्यांना सहाय्यक पोलीस फोजदार कल्याण ढवणे;, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू चोंगुले. पोलीस नाईक विजय थिठे, पोलीस नाईक दत्तात्रय वजाळे, पोलीसनाईक आप्पा पवार, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे,
पोलीस कॉन्स्टेबल गणेश
कुलकर्णी पोलीस कॉन्स्टेबल
ग्रणेश कोळेकर, सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल अनवत आतार, चालक पोलिस कॉन्स्टेबल सुनील लोंढे, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर भुजबळ यांनी सदर गुन्ह्याच्या तपास कामात मदत केली आहे.

गोरख कोळेकर, संतोष विठ्ठुल पांढरे व वैभव तानाजी आलदर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केला असता त्यांनी सदरचा गुन्हा कबुल केला आहे. आरोपी विलास सरगर याने मयत मुलगा विजय विलास सरगर यास मारण्याची सुपारी दिली होती.

आरोपींनी पूर्वनियोजित कट करून ११ जुलै रोजी विजय सरगर यास डाळिंबाची स्वस्त दरात खरेदी करून देण्याचा बहाणा करून त्यास टमटम घेऊन बोलून घेतले.

त्याच्यासोबत कोळा येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून ठरलेल्या कटाप्रमाणे रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान मोकळ्या रानात कोयत्याने विजयचे मुंडके तोडून त्याचा खून केला. मृतदेह चटई व शेडनेटमध्ये दोरीने बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दगड बांधून मृतदेह तलावात टाकून दिला
असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

litsbros

Comment here