सोलापूर जिल्हासोलापूर शहर

धक्कादायक! रिपांई(ए)चे सोलापूर शहराध्यक्ष उमेश मस्के यांचे निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक! रिपांई(ए)चे सोलापूर शहराध्यक्ष उमेश मस्के यांचे निधन

सोलापूर; सोलापूर शहरातील अतिशय धक्कादायक व दुःखद बातमी समोर आली आहे. रिपाइं (अ)चे सोलापूर शहराध्यक्ष उमेश मस्के यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 36 होते. त्याच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे ते सर्व स्वागत नगर भागातील हूच्चेश्वर नगर भागात राहत होते.

कमी वयात सामाजिक कार्यात मोठी झेप उमेशने घेतली होती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या पक्षात उमेश हा सोलापूर शहराध्यक्ष म्हणून मागील काही वर्षापासून काम करत होता. या पक्षाच्या माध्यमातून सर्व सामान्य, गरिबांना न्याय मिळवून देण्यासठी त्याची धडपड होती.

उमेश मस्के व काही मित्र शुक्रवारी मुंबईला जात होते. वाटेत ते खोपोली जवळ जेवण करून गाडीत झोपला असता खंडाळा घाटाजवळ अचानक छातीत दुखू लागले व त्यातच हृदयविकाराच्या झटकयामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मस्के याचे पार्थिव दुपारी सोलापुरात आणल्या नंतर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील असे सांगण्यात आले.

litsbros

Comment here