सोलापूरसोलापूर शहर

सोलापुरातील पोलीस उपनिरीक्षकाचे कोरोनाने निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापुरातील पोलीस उपनिरीक्षकाचे कोरोनाने निधन

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत असलेल्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राहूल वैजिनाथ बोराडे (वय 36, रा. विजय देशमुख नगर, विजापूर रोड सोलापूर) यांचे निधन झाले. कोरोना नंतर फुफ्फुसातील संसर्ग वाढल्याने निधन झाले.

त्यांना कोरोना झाल्यानंतर तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, परंतु कोरोना नंतर फुफ्फुसातील संसर्ग वाढल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. फौजदार राहूल बोराडे हे काही महिन्यापुर्वीच सोलापूर पोलीस आयुक्तालयात रुजू झाले होते. अवघ्या ३६ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

हेही वाचा-कुगाव येथील महिलेला अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर करमाळा पोलिसात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

ब्रेकिंग; संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा, ‘या’ तारखेला पुन्हा होणार ‘मराठा मोर्चा’

राहूल बोराडे यांच्या निधनाने सोलापूर पोलीस दलात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, वहिनी असा मोठा परिवार आहे.

litsbros

Comment here