Breaking News तेजस्विनी सातपुते यांची बदली; आता ‘हे’ नवे सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
करमाळा (प्रतिनिधी); सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी आता नव्यानेच शिरीष सरदेशपांडे हे रुजू होणार असून यापूर्वीचे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांची बदली करण्यात आली आहे.
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सातपुते यांची तडकाफडकी बदली केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सौ तेजस्विनी सातपुते यांनी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे घेतल्यापासून अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले होते.
एक कणखर, धाडसी, हुशार, हजर जवाबी, महिला पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते त्यांच्या अचानक बदलीने पोलीस दलात खळबळ माजली आहे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अवैध दारू विक्रेत्यांना जेरीस आणून अवैध दारू विक्री बंद करून नव्यानेच त्यांचा संसार उभा केला होता.
अशा या जिगरबाज महिला अधिकाऱ्याची बदली झाल्याने अवैध धंदे वाल्यांची मात्र चलती होणार आहे. नवीन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक सरदेशपांडे हे नाशिक येथून पोलीस अकॅडमी मधून बदली होऊन आले आहे.
Comment here