राजकारणसोलापूर जिल्हा

राहूल गांधी यांनी घेतला सोलापूरी जेवणाचा आस्वाद

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राहूल गांधी यांनी घेतला सोलापूरी जेवणाचा आस्वाद, स्वत: तळली सोलापूरी आंध्रा भजी
..आमदार प्रणिती शिंदे यांनी केले होते नियोजन

भारत जोडो यात्रा : सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या संकल्पनेतून भारत जोडो यात्रेमध्ये पातूर ते बाळापूर, अकोला या मार्गावरील श्री गजानन रोप वाटीका येथे मा. राहूल गांधी जी व भारत जोडो यात्रींकरिता सोलापूरी खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते. सदर स्टॉलमध्ये आंध्रा भजी बनवित असलेले पाहून मा. राहूल गांधी जी यांनी महिलांना विचारले की मी पण हे बनवू शकतो का अशी परवानगी घेत स्वतः भजी तळली.

या स्टॉलवर कडक ज्वारीची भाकरी, कडक बाजरीची भाकरी, धपाटे, आंध्रा भजी, शेंगा चटणी, दही, खिर (हुग्गी) चा समावेश होता. या खाद्यपदार्थांचा आस्वाद मा. राहूल गांधी जी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये घेतला व आमदार प्रणिती शिंदे आणि याकरिता राबलेल्या सर्व टीमचे कौतुक केले आणि खाद्यपदार्थ खूप सुंदर होते अशी भावना व्यक्त केली. सोलापूरील खाद्यपदार्थ बनविण्याकरीता सोलापूर येथील यल्लप्पा तुपदोळकर, शांतकुमार बलगेरी, महानंदा रामपूरे, लक्ष्मी यादगिरी, पद्मिणी शेट्टीयार व समाधान हाके यांनी परिश्रम घेतले.

litsbros

Comment here