राजकारणसोलापूर

सोलापुरात मुख्यमंत्री शिंदे गटाची बैठक; नव्या पदाधिकारी निवडी होणार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापुरात मुख्यमंत्री शिंदे गटाची बैठक; नव्या पदाधिकारी निवडी होणार

सोलापूर; महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यभरात त्यांनी आपला विस्तार करायला सुरुवात केली आहे सोलापुरात सुद्धा शिंदे सरकारचा नवीन आराखडा तयार होत आहे या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवारी दुपारी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात शहर आणि जिल्ह्यातील शिंदे सेनेचे नवीन पदाधिकारी निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला मुख्यमंत्री समर्थक मनीष काळजे, अमोल शिंदे, मनोज शेजवाळ,अनिकेत पिसे, उमेश गायकवाड , तुकाराम मस्के, हरिभाऊ चौगुले,तसेच ग्रामीण भागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सोलापूर महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम पदाधिकारी निवडीचा श्री गणेशा करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

दरम्यान प्राध्यापक शिवाजी सावंत हे शासकीय विश्रामगृहात असल्याचे समजतात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सुद्धा प्राध्यापक सावंत यांची भेट घेतली आणि प्राध्यापक सावंत यांनी आमदार राऊत यांचा यथोचित सन्मान केला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शिंदे सेनेचे पदाधिकारी निवडीवर आज गुरुवारी शिक्का मोर्तब होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – करमाळा मतदार संघातील टेंभुर्णी-कन्हेरगाव-केम रस्त्याची झाली दुरवस्था; तात्काळ दुरुस्ती न केल्यास उपोषणाचा इशारा

करमाळा शहर व तालुक्यात पावसाचा हाहाकार; शहरात अनेक घरात पाणीच पाणी, नागरिक म्हणतात..

त्यानंतर खऱ्या अर्थाने आगामी सोलापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला रणनीती आखण्यात येणार आहे.

 

litsbros

Comment here