महाराष्ट्रमुंबईसोलापूर जिल्हासोलापूर शहर

आणखी एक ‘हा’ नवा महामार्ग सोलापुरातून जाणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आणखी एक ‘हा’ नवा महामार्ग सोलापुरातून जाणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सोलापूर(प्रतिनिधी); महामार्गांचे अवतीभोवती जाळे असलेल्या सोलापूरकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग केला.

त्याच धर्तीवर आता ‘नागपूर ते गोवा’ हा 760 किलोमीटर लांबीचा महामार्ग एमएसआरडीसी च्या माध्यमातून उभा करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

या महामार्गासाठी सुमारे 75 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे नागपूर गोवा हा समृद्धी महामार्ग विदर्भातील वर्धा येथून सुरू होईल तो सिंधुदुर्ग मधील गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे संपेल.

हा महामार्ग वर्धा येथून समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. नागपूर- वर्धा- यवतमाळ- हिंगोली- नांदेड- लातूर- बीड- धाराशिव- सोलापूर- सांगली -कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यातून जाणार आहे.

 

litsbros

Comment here