करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हासोलापूर शहर

मशीद म्हटलं की मुस्लिमेतर सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये अनेक प्रश्‍न उपस्थित होतात; ‘मशीद परिचय’ उपक्रमात शेकडो मुस्लिमेतर नागरिकांनी जाणून घेतली मशीदीबद्दल माहिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मशीद म्हटलं की मुस्लिमेतर सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये अनेक प्रश्‍न उपस्थित होतात; ‘मशीद परिचय’ उपक्रमात शेकडो मुस्लिमेतर नागरिकांनी जाणून घेतली मशीदीबद्दल माहिती

मुस्लिमेतर नागरिकांसाठी जमीअत ए अहिले हदीस या संघटनेचा स्तुत्य उपक्रम

मशीद म्हटलं की मुस्लिमेतर सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये अनेक प्रश्‍न उपस्थित होत असतात. त्यामध्ये मशिदीत पडली जाणारी नमाज असेल, मशिदी मधून दिली जाणारी अजान असेल किंवा मशिदीच्या माध्यमातून केले जाणारे संबोधन अर्थात बयान असेल. या सर्व घडामोडींविषयी सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचं कुतूहल नेहमीच असतं.

मशिदीमध्ये नेमकं काय चालतं ? मशिदीमधले कार्यक्रम कसे असतात? मशिदीमध्ये आल्यानंतर मुसलमानांचे क्रियाकलाप कसे असतात? हे असे आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तर देण्यासाठी सोलापुरातल्या जमिअत ए अहले हदीस या संघटनेकडून ‘मस्जिद परिचय’ उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

‘मेक इंडिया बेटर’ या अभियानाअंतर्गत सोलापुरातल्या हाजी हजरत खान मस्जिद या ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत 15 ऑगस्ट रोजी या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. सोलापूर शहर पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी मशीदिला भेट देत उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. समाजात धार्मिक सुसंवाद होण्याची गरज आहे. त्यासाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी केले. प्रारंभी जमीअत ए अहले हदिस यांच्या वतीने उपयुक्तांचे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.

15 ते 17 ऑगस्ट दरम्यान चाललेल्या या उपक्रमात सोलापुरातील अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला. अणी मशीदीविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी अनेकांच्या मनात मशीदीबद्दल अगदी सर्वसामान्य प्रश्न होते. त्या प्रश्नाची उकल या उपक्रमाच्या माध्यमातून झाल्याच्या भावना भेट देणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली.

हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी जमीअत ए अहले हदिसचे जिल्हाध्यक्ष मुख्तार हुमनाबादकर, सचिव मौलाना ताहेर बेग, अब्दुल अजीज शेख, जमील कोलार, इस्माईल दलाल यांच्यासह अनेक तरुणांनी प्रयत्न केले.

आपला देश हा विविध जाती, धर्म, आस्था, श्रद्धा यांचा देश आहे. विविधतेत एकता हेच आपल्या देशाचे सौंदर्य आणि सामर्थ्य आहे. ही एकता टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या देशात लोकांमध्ये एकमेकांबद्दल विश्वास, प्रेम आणि सद्भावना अधिकाधिक वाढेल. याच उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूरकरानी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद या उपक्रमाला दिला.

– मुख्तार अहमद हुमनाबादकर, अध्यक्ष, जमीअत ए अहले हदिस, सोलापूर

मशीद ही खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे केंद्र आहे. हीच भावना मस्जिद परिचय या उपक्रमाला भेट दिल्यानंतर झाली. मशीदीला भेट दिल्यानंतर अनेक नवीन गोष्टींची माहिती मिळाली. विशेषतः मशीदीत ठेवण्यात येणारी स्वच्छता मनाला भावली.

– ऍड. पूजा खंदारे, वकील

मशीद परिचय या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने गैरसमज दूर केले जात आहेत ते खरच कौतुकास्पद आहे. देशात आज ज्या पद्धतीचे वातावरण आहे त्यामध्ये अशा उपक्रमाची गरज आहे. केवळ सोलापूरच नाही तर देशभरात हा उपक्रम राबविला गेला पाहिजे.

– राज सलगर, सामाजिक कार्यकर्ते

litsbros

Comment here