ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले; सोलापूर जिल्ह्यातील १८९ , त्यात करमाळा तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीत रणधुमाळी
राज्याच्या निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान मुदत संपणाऱ्या महाराष्ट्रातील 7751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मुदत संपणाऱ्या 189 ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. त्या निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.
महाविकास आघाडी सरकारने थेट जनतेतून सरपंच निवड रद्द केली होती मात्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी पुन्हा सरपंच निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणूकित सरपंच निवड ही थेट जनतेतून होणार आहे.
असा आहे कार्यक्रम
तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक -18 नोव्हेंबर 2022
नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृतीचा दिनांक सोमवार 28 नोव्हेंबर 2022 ते शुक्रवार 2 डिसेंबर 2022
अर्ज छाननी करण्याचा दिनांक : सोमवार 5 डिसेंबर 2022
नामनिर्देशक पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक : 7 डिसेंबर 2022 दुपारी 3 पर्यंत व त्याच दिवशी दुपारी 3 नंतर चिन्ह वाटप
आवश्यक असल्यास मतदान घेण्याचा दिनांक : 18 डिसेंम्बर 2022
मतमोजणी दिनांक : 20 डिसेंबर 2022
निवडणुका होणार ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे
अक्कलकोट 20, पंढरपूर 11, बार्शी 22, माढा 8, मंगळवेढा 18, मोहोळ 10, माळशिरस 35, उत्तर सोलापूर 12, दक्षिण सोलापूर 17, सांगोला 6, करमाळा 30
करमाळा तालुक्यातील 30 ग्रामपंचायती खालील प्रमाणे
Comment here