मोठी बातमी:सोलापूर जिल्ह्यात ‘ या ‘ तारखेपासून कडक लॉकडाऊन;भाजीपाल्यासह किराणा दुकाने ही बंद ठेवण्याचे जिल्हाधिकार्ऱ्यांचे आदेश
सोलापूर – सध्या शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्याचा आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. काही सेवा चालु असल्याने लोक बाहेर पडत असल्याचे लक्षात आल्याने कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येत्या ८ मे रात्री आठ वाजल्यापासून १५ मे सकाळी सात वाजेपर्यंत मेडिकल अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवाची दुकाने बंद राहणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी रात्री पञकार परिषद घेवुन ही माहिती दिली.
ऑक्सिजन बेडअभावी आईने प्राण सोडले, सॅनिटायझर पिऊन लेकीची आत्महत्या
आरोग्य सेवा वगळता इतर गोष्टी साठी निर्बंध कडक केले आहेत.त्यामुळे भाजी पाला विक्रीसह किराणा दुकाने हाॅटेल,मॉल, बिअर दुकाने वाईनशाॅप बेकरी,आडत दुकाने,खाजगी आस्थापना बंद राहणार आहेत तर कृषी दुकाने सुरु राहतील त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन शंभरकर यांनी केले आहे.
यावेळी महापालिका आयुक्त पी शिवशंकर तसेच जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी उपस्थितीत होते.
Comment here