आरोग्यसरकारनामासोलापूरसोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होईना; लॉकडाऊन बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढले ‘हे’ आदेश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होईना; लॉकडाऊन बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढले ‘हे’ आदेश

सोलापूर : सोलापूर शहरातील रुग्णसंख्या कमी होत आहे. शहराची वाटचाल कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजून रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दि. १२.०६.२०२१ रोजी सायंकाळी ०६.०० वा. व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक आयोजित करणेत आलेली होती.

सदर बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कोव्हीड बाधीत रुग्णांचा दि. ०४.०६.२०२१ ते दि. १०.०६.२०२१ या सप्ताहातील सरासरी पॉझिटीव्हीटी रेट हा ५.१०% असून ऑक्सिजन बेडस् व्यापलेली टक्केवारी २०% असल्याने महाराष्ट्र शासनाकडील दि. ०४.०६.२०२१ अन्वये देण्यात आलेल्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्हा निबंध स्तर-३ मध्ये अंतर्भूत होत आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये सर्वानुमते शासनाच्या निदेशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यासाठी स्तर-३ दि. ०७.०६.२०२१ पासून लागू केलेल्या निर्बंधांना पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देणेबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय क्षेत्र वगळून, सोलापूर जिल्हा ग्रामीण क्षेत्र वेगळा प्रशासकीय घटक मानण्यात येत आहे. यानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीण क्षेत्र मधील कोव्हीड-१९ चा दि. १०.०६.२०२१ रोजीचा पॉझिटीव्हीटी दर ५.१०% असून वापरण्यात आलेले ऑक्सिजन बेड ची टक्केवारी (The Occupancy of total Oxygen Beds) दर हा २०% आहे.

राज्य शासनाने निश्चित केलेल्या एकूण पाच स्तरांपैकी सोलापूर जिल्हा (सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय क्षेत्र वगळून) हा प्रशासकीय घटक तीसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे.

हेही वाचा-करमाळा नगरपालिकेच्या कामाची चौकशी करून मुख्याधिकारी पवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- नागेश कांबळे

आर्थिक घोटाळयावरून प्रांताधिकारी दीपक शिंदे तडकाफडकी निलंबित : सोलापूर जिल्हा महसूल विभागात खळबळ

त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये सोलापूर जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय सोलापूरची हद्द वगळून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना (कोव्हीड-१९) विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात यापूर्वीचे दि. ७.६.२०२१ अन्वये देण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

litsbros

Comment here