क्राइमसोलापूरसोलापूर जिल्हा

हातभट्टी दारू तयार होणार्‍या १४ ठिकाणी छापे,साडेबारालाखाची दारू नष्ट;सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

हातभट्टी दारू तयार होणार्‍या १४ ठिकाणी छापे,साडेबारालाखाची दारू नष्ट;सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी

सोलापूर ग्रामीण दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी अवैध व्यवसायांवर कारवाईची विशेष मोहीम राबवली.या मोहीमेत मुळेगाव तांडा येथील हातभट्टी दारू तयार होणाऱ्या १४ ठिकाणी छापा टाकूनक्षबारा लाख ३९ हजार २००रुपयाचाची दारू नष्ट करून १४ जणांवर गुन्हे
दाखल करण्यात आले आहे.


याबाबत मिळालेली सविस्तर माहीती अशी की,शनिवारी
सकाळी तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर गावच्या शिवारात हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर १४ ठिकाणी छापे
टाकून १२ लाख ३९ हजार २०० रुपयाची हातभट्टी दारू जागेवरच नष्ट करण्यात आली. १४जणांवर गुन्हा दाखल केला आहे.यापुढेही सोलापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या अवैद्य धंद्यावर कारवाई सुरू राहणार असून संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस
अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

हेही वाचा – आईवडिलांना न सांभाळणाऱ्या मुलाचा 30% पगार आई वडिलांच्या खात्यात: महाराष्ट्रातील ‘या’ जिल्हा परिषदेत कार्यवाही सुरू

 

या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून अवैद्य व्यवसाय करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
सदरच्या कामगिरीमध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष सहभागात पोलीस उपविभागीय अधिकारी प्रभाकर शिंदे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुहास जगताप,पोलीस निरीक्षक फुगे, सपोनि काजळकर सपोनि बंडगर, तावरे, दळवी,इंगळे पिंगवाले, महिला शिपाई गोडबोले, तसेच ग्रामीणचे आरसीबी पथक, क्यू आर टी पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांनी या कारवाईत भाग घेतला.

litsbros

Comment here