अक्कलकोटकरमाळाक्राइमपंढरपूरपंढरपूरबार्शीमाढामाळशिरससांगोलासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस राबविणार ‘ऑपरेशन परिवर्तन’ अवैध धंदे टार्गेट

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस राबविणार ‘ऑपरेशन परिवर्तन’ अवैध धंदे टार्गेट

हातभट्टीची दारु बनविणाऱ्या गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होत असले तरी हे गुन्हेगार पुन्हा हातभट्टीची दारू बनविण्याचे काम करतात. अनेक गुन्हेगारांना कलम ३२८ लावत नसल्याने गुन्हेगारांना जामीन मिळतो. हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन होण्यासाठी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिसांतर्फे ‘ऑपरेशन परिवर्तन’ राबविण्यात येणार आहे.

हातभट्टीच्या अवैध दारुबाबत दाखल केसेस मध्ये शिक्षा लागल्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आपल्या जिल्हयात ज्या ठिकाणी मोठया प्रमाणात हातभट्टीची दारू काढली जाते त्या ठिकाणांची यादी व सदर गाव/ ठिकाण ज्या अधिकाऱ्यास दत्तक दिले आहे.

हेही वाचा- जिंती येथे एकुलत्या एका मुलाची वडिलांना बेदम मारहाण; वडिलांचा मृत्यू

करमाळा तालुक्यातील ‘या’ ग्रुप ग्रामपंचायतीच्या विभाजनाची उच्च न्यायालयाचे आदेश; पाच गावच्या ग्रामस्थांत आनंद

सदर ठिकाणावरील अवैध दारूची निर्मीती कायमची थांबविण्याचे दृष्टीने सातत्याने व नियमीत उपाय योजना करून त्या ठिकाणावरील हातभट्टी अवैध दारु निर्मीतीचे समूळ उच्चाटन करण्याच्या हेतूने सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सर्व संबंधित अधिका-यांनी आदेश काढले आहेत.

 

उत्तर सोलापूर तालुक्यातील गावे व दत्तक अधिकारी

गुळवंची तांडा – पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे सायबर पोलिस स्टेशन

तिऱ्हे तांडा – पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील स्थानिक गुन्हे शाखा

कोंडी तांडा- पोलिस निरीक्षक अरुण फुगे सोलापूर तालुका पोलिस स्टेशन

सेवालाल नगर- सहायक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर सोलापूर तालुका पोलिस स्टेशन

litsbros

Comment here