अक्कलकोटकरमाळापंढरपूरबार्शीमंगळवेढामाळशिरसरोजगारसांगोलासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापूर ग्रामीण पोलीस भरती २०१९ चा लेखी पेपर होणार ‘या’ दिवशी; परीक्षार्थींसाठीच्या या आहेत महत्वाच्या सूचना

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर ग्रामीण पोलीस भरती २०१९ चा लेखी पेपर होणार ‘या’ दिवशी; परीक्षार्थींसाठीच्या या आहेत महत्वाच्या सूचना

उमरड(प्रतिनिधी) ; सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असणाऱ्या 41 चालक पोलीस शिपाई पदाच्या भरती करिता 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. सदर पोलीस भरतीचा पेपर तेव्हा स्थगित करण्यात आला होता.

तरी आता त्या सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा १ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सकाळी ८ वाजता हजर रहावे असे सांगण्यात आले असून सकाळी ९;३० च्या नंतर आलेल्या उमेदवारांना परीक्षेला प्रवेश मिळणार नाही.

या परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून विभागाच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येणार आहे. तसेच परीक्षेला येताना प्रवेशपत्र पूर्ण 4 पानी, अलीकडच्या काळातील दोन पासपोर्ट फोटो, काळे,निळे पेन व आधारकार्ड सह इतर ओळख पुरावे आणावे.

हेही वाचा- ..त्या मच्छिमार बाप लेकाच्या सतर्कतेमुळे करमाळ्यातील ड्रायव्हर चे वाचले प्राण; मारुती गाडी डिकसळ पुलावरून गेली पाण्यात

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात सुरुय जोरदार पाऊस; करमाळा तालुक्यात आजवर झाला ‘इतके’ टक्के पाऊस

तर सोबत मोबाईल, स्मार्ट घड्याळ, कॅलक्युलेटर, ब्लुटूथ अशी उपकरणे आणू नयेत असे आवाहन जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक सोलापूर यांचे कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

litsbros

Comment here