करमाळापंढरपूरबार्शीमाढाराजकारणसोलापूर जिल्हा

सोपलांनी करून दाखवलं, दुध संघासाठी ‘यांची’ बिनविरोध निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोपलांनी करून दाखवलं, दुध संघासाठी ‘यांची’ बिनविरोध निवड

बार्शी – शिवसेना नेते आणि माजीमंत्री दिलीप सोपल गेल्या 15 दिवसांपासून सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकांसाठी बैठका घेत आहेत. त्यातच, गेल्या 4 दिवसांपासून सातत्याने ते सोलापूर दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करुन अखेर जिल्हा दुध संघाची निवडणूक बिनविरोध करण्यात त्यांना यश आले.

बार्शी तालुक्यातून माजी नगराध्यक्ष योगेश सोपल आणि छाया ढाकणे यांची जिल्हा दुध संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा- BreakingNews मकाई कारखान्याला साखर आयुक्तांचा दणका; ५ कोटी 63 लाखांचा दंड; दिग्विजय बागल यांच्या मनमानी कारभाराला दणका

मुबंई पुणे एक्सप्रेस वे वर अपघात, सोलापुर जिल्ह्यातील तिघे तरुण तर तुळजापुर येथील एक तरुण जागीच ठार

माजी मंत्री दिलीप सोपल यांना बाजारसमिती, आमदारकी, वैराग नगरपंचायत या निवडणुकांमध्ये पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे, गेल्या अनेक पराभवानंतर जिल्हा दुध संघाच्या माध्यमातून त्यांनी विजयश्री मिळवली आहे. त्यामुळे, सोपल गटाने विजयाचा आनंद व्यक्त केला.

आगामी बार्शी नगरपालिका निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी होत आहे. त्यासाठीही बार्शीत राजकीय वातावरण चांगलंच रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे.

litsbros

Comment here