अक्कलकोटआरोग्यकरमाळापंढरपूरबार्शीमंगळवेढामाढामाळशिरससांगोलासोलापूर जिल्हासोलापूर शहर

डेल्टा प्लसचा धोका; सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात पुन्हा रात्रीची संचारबंदी, लग्न समारंभ व इतर सर्व बाबींसह काय काय आणि किती वाजेपर्यंत सुरू.? वाचा जिल्हाधिकारी शंभरकर यांचा नवा आदेश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

डेल्टा प्लसचा धोका; सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात पुन्हा रात्रीची संचारबंदी, लग्न समारंभ व इतर सर्व बाबींसह काय काय आणि किती वाजेपर्यंत सुरू.? वाचा जिल्हाधिकारी शंभरकर यांचा नवा आदेश

सोलापूर, दि.26- अनलॉक केल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. तसेच आगामी काळातील कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने संपूर्ण राज्यात पुन्हा निर्बंध लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हयाच्या ग्रामीण भागात यापूर्वी 7 जून रोजीपासून लागू केलेल्या निर्बंध कालावधीत पुन्हा वाढ करण्याचा आदेश काढला आहे.

या आदेशानुसार दिवसभर म्हणजेच सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व व्यवहार पूर्ण करून घरी जाणे अपेक्षित आहे. पाच वाजेपर्यंत जमावबंदी तर सायंकाळी पाचनंतर संचारबंदी कायम करण्यात आली आहे.

नवा आदेश

ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने दररोज दुपारी चार वाजेपर्यंत तर बिगर अत्यावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. शनिवार व रविवार पूर्ण दिवसभर बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद राहणार आहेत.

मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगलस्क्रीन थिएटर, नाट्यगृह बंद राहतील. रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 पर्यंत 50 टक्केच्या क्षमतेने उघडतील. त्यानंतर पार्सलसेवा सुरू राहील. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, वॉक, सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत दररोज सुरु राहतील. खासगी कार्यालये सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. सरकारी व खाजगी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती.

सामाजिक, सांस्कृतिक किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमांना सायंकाळी 4 पर्यंत 50 टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. लग्न समारंभात 50 लोक तर अंत्यविधीला 20 लोक उपस्थित राहू शकतात. बांधकाम साईटवर उपस्थित कामगारांद्वारे दुपारी 4 वाजेपर्यंत काम सुरू ठेवता येईल. ई-कॉमर्स नियमित सुरू राहील. कृषी क्षेत्रातील कामे सायंकाळी 4 पर्यंत सुरु राहतील. सार्वजनिक वाहतूक 100 टक्के क्षमतेने सुरू राहील.

हेही वाचा- एसटी व मोटारसायकलच्या अपघातात खडकेवाडी येथील एकाचा मृत्यू

पुन्हा पेटला करमाळा बाजार समितीत सत्तावाद; उद्या २८ जूनला होणार सुनावणी; वाचा सविस्तर प्रकरण

ग्रामीण भागात सध्या हे नियम सुरूच आहेत. परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. आता याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार आहे.

litsbros

Comment here