रमजान ईद झाल्यावर सोलापूर जिल्ह्यात लाॅकडाऊन करावा; ‘या’ मुस्लिम नेत्याची आग्रही मागणी
जेउर( प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांनी दिनांक 8 मे च्या रात्री पासून 15 मे पर्यंत लाॅकडाऊन जाहीर केले आहे. यामध्ये फक्त मेडिकल दुकान व दुध होम डिलवरी तसेच कोवीड लस घेण्यासाठी सुट दिली आहे. तर येत्या 14 मे ला मुस्लिम समाजातील सर्वात मोठा सण रमजान ईद आहे.
तरी रमजान ईद नंतर 15 मे पासून कडक लाॅकडाऊन करण्यात यावा अशी मागणी करमाळा मुस्लिम समाज अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
यावेळी केलेल्या ईमेल मध्ये म्हटले आहे की सध्या सोलापूर जिल्ह्यात लाॅकडाऊन चालू आहे यामध्ये मेडिकल दुकान दुध भाजीपाला किराणा दुकान अत्यावश्यक सेवा सकाळी अकरा वाजेपर्यंत चालू आहे हा लाॅकडाऊन 14 मे पर्यंत ठेवण्यात यावा व 15 मे पासून कडक लाॅकडाऊन करण्यात यावा अशी मागणी तांबोळी यांनी केली आहे.
Comment here