राजकारणसोलापूर जिल्हासोलापूर शहर

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी “ई- प्रचार” समिती प्रमुख पदी आ. प्रणिती शिंदे यांची निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी “ई- प्रचार” समिती प्रमुख पदी आ. प्रणिती शिंदे यांची निवड

सोलापूर; नुकतीच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीची शिर्डी येथे दोन दिवशीय नवसंकल्प कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत राजकीय समितीने भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काही महत्वाच्या समित्या स्थापन करण्याचे प्रस्तावित केले.

त्या अनुषंगाने मा. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार उद्दिष्टासह काही समित्या गठीत करण्यात आले असून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राज्यस्तरावर वेब पोर्टल व डिझिटल चॅनेल उभारणे तसेच सोशल मीडियावरील प्रचारासाठी असलेली प्रदेश काँग्रेसची यंत्रणा अधिक सक्षम करणे या साठी ई- प्रचार समितीची स्थापन करण्यात आली असून त्याच्या प्रमुखपदी आ. प्रणिती शिंदे यांची निवड करण्यात आली.

तसेच समिती सदस्य म्हणून मा. सतेज पाटील, मा. विश्वजित कदम, अभिजित सपकाळ, व समन्वयक म्हणून विशाल मुत्तेमवार यांची निवड करण्यात आली.

litsbros

Comment here