ताज्या घडामोडीबार्शीशैक्षणिकसोलापूर जिल्हा

UPSC परीक्षेत इतिहास, सोलापूरचा डंका; बार्शीचा अजिंक्य दुसऱ्यांदा UPSC उत्तीर्ण; का दिली दोनदा परीक्षा ? वाचा अजिंक्यचा प्रेरणादायी प्रवास

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

UPSC परीक्षेत इतिहास, सोलापूरचा डंका; बार्शीचा अजिंक्य दुसऱ्यांदा UPSC उत्तीर्ण; का दिली दोनदा परीक्षा ? वाचा अजिंक्यचा प्रेरणादायी प्रवास

बार्शी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण झालो. पण जिल्हाधिकारी होण्याची इच्छा होती. त्यामुळे यूपीएससीची तयारी सुरूच होती. शिक्षण सुरू असताना दोन वेळा यूपीएससी परीक्षा दिली, पण यश आले नाही. आता तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र यश प्राप्त झाल्याचे बार्शी येथील अजिंक्‍य विद्यागर यांनी 1.5 वर्षापूर्वी म्हटले होते. आज अजिंक्य यांनी दुसऱ्यांदा UPSC परीक्षा पास होत बार्शीत इतिहास घडवला.

पहिल्यांदा UPSC क्रॅक केल्यानंतर रेल्वे सेवेत अधिकारी असलेले अजिंक्य आज दुसऱ्यांदा UPSC परीक्षा पास झाले आहेत. सध्या ते गुजरातच्या वडोदरा येथे कार्यरत आहेत. आज दुसऱ्यांदा UPSC परीक्षा पास होऊन देशात 617 वी रँक मिळवत ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे IPS होण्याचं त्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

अजिंक्‍य यांचे वडील प्रा. अनंत विद्यागर हे बार्शी येथील बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमधून सेवानिवृत्त झाले आहेत तर आई आशा जोगदंड-विद्यागर आगळगाव येथे मुख्याध्यापिका आहेत.

litsbros

Comment here