बार्शीराजकारणसोलापूर जिल्हा

बार्शीत राजकारण तापले, माजी मंत्र्याच्या बंगल्यासमोर फोडली स्फोटके

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बार्शीत राजकारण तापले, माजी मंत्र्याच्या बंगल्यासमोर फोडली स्फोटके

बार्शी; माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बंगल्याच्या गेटवर तसेच गेटच्या आतमध्ये दिवाळीत पाच जणांनी मोठ्या तीव्रतेने आवाज करणारी स्फोटके फोडल्याबद्दल 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदार राजेंद्र राऊत यांच्या समर्थकांनी हे स्फोटके फोडण्याचा माजी मंत्री दिलीप सोपल यांचा आरोप आहे. स्फोटके फोडतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. ही घटना 23 ऑक्टोबरला मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान घडली होती.

या प्रकरणी माजी मंत्री दिलीप सोपल यांनी पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर आज (3 नोव्हेंबर) बार्शी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.

पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते, नीलेश मस्के, अंबादास रणझुंजारे, महेश पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

ही घटना 23 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली होती. सोपल यांनी 24 ऑक्टोबर रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने आज माजी मंत्री दिलीप सोपल यांनी स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून स्फोटके फोडणाऱ्यांच्या नावांसह फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

संबंधित प्रकरणामुळे दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. खरंतर या दोन्ही नेत्यांमध्ये सतत राजकीय वाद उफाळून येत असतो.

दोन महिन्यांपूर्वी आर्यन शुगर या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकवलेले बील देण्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये वाद उफाळून आला होता.

लोकांचे पैसे बुडवून आमचा काही संबंध नाही असं म्हणणाऱ्या दिलीप सोपलांवर ईडीची चौकशी लावणार आहे, असं वक्तव्य राजेंद्र राऊत यांनी केलं होतं. “शेतकऱ्यांचे पैसे खायचे आणि माझा काही संबंध नाही म्हणायचं ही मग्रूरीची भाषा चालणार नाही आता ई़डी, इन्कम टॅक्स आहे, माझा काय संबंध असे म्हणून चालणार नाही”, असं राजेंद्र राऊत म्हणाले होते.

litsbros

Comment here