धार्मिकराजकारणसोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापुरात एमआयएम कडुन विराट मोर्चा; हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव एकवटला; भाजपच्या ‘या’ दोन नेत्यांना अटक करा, या मागणीसाठी काढला मोर्चा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापुरात एमआयएम कडुन विराट मोर्चा; हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव एकवटला; भाजपच्या ‘या’ दोन नेत्यांना अटक करा या मागणीसाठी काढला मोर्चा
— भाजपच्या दोन्ही नेते विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशा मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महम्मद पैगंबर यांच्या विषयी अवामानकारक टिपणी करणाऱ्या भाजप प्रवक्ते नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांना अटक करा या मागणीसाठी एमआयएम शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली पासपोर्ट कार्यालयाच्या एमआयएम कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनम गेट समोर आज शुक्रवारी विराट मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधून घेतले. प्रथमच गट-तट विसरून सर्व मुस्लीम राजकीय नेते, मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता.

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी हजरत महंमद पैगंबर यांच्या विषयी अवमान कारक टिपणी केल्यामुळे जगभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सोलापुरात ही एमआयएम शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांनी केलेल्या आवाहनाला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून मुस्लिम समाजाने प्रचंड असा प्रतिसाद दिला.
शुक्रवार असल्याने दुपारच्या नमाज नंतर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चामध्ये मुस्लिम बांधवांनी भारताचा तिरंगा ध्वज, हिरवे झेंडे आणि निषेधाचे काळे झेंडेही हाती.

हा मोर्चा पासपोर्ट कार्यालयाच्या समोरून निघून सिद्धेश्वर प्रशाले मार्गे जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटला येणार होता. मुस्लिम समाजातील युवकांची हजारोंची गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या मार्गावर मोठा बंदोबस्त लावला.

या मोर्चात फारूक शाब्दी, शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी,मौलाना ताहेर बेग, जमियत ए उलमाचे पदाधिकारी,तोफिक शेख, रियाज हुंडेकरी, रेश्मा मुल्ला, गाझी जहागीरदार सहभागी झाले. त्याबरोबर मुस्लिम बांधव ,महिला, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मोर्चानंतर भाजपच्या दोन्ही नेत्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

या मोर्चासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, बापू बांगर यांच्यासह सहाय्याक पोलिस आयुक्त परमार, माधव रेड्डी, तसेच पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, उदयसिंह पाटील, करणकोट, विकास देशमुख, दोरगे यांच्यासह फौजदार चावडी, सदर बझार, जेलरोड, मुख्यालय या ठिकाणचा पोलिस कर्मचार्‍यांचा मोठा बंदोबस्त मोर्चासाठी होता. त्याचप्रमाणे शहर वाहतूक शाखेचा स्वतंत्र बंदोबस्त तैनात केला होता.

litsbros

Comment here