महाराष्ट्रशैक्षणिकसोलापूरसोलापूर जिल्हा

हजारो अधिकारी घडविणारे ‘मराठी गुरू’ ; मराठी व्याकरणात विद्यार्थ्यांना केले तरबेज; निवृत्तीनंतरही अध्यापन सुरुच

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

हजारो अधिकारी घडविणारे ‘मराठी गुरू’ ; मराठी व्याकरणात विद्यार्थ्यांना केले तरबेज; निवृत्तीनंतरही अध्यापन सुरुच

सोलापूर:शालेय अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षेत मराठी विषयाला अन्यन साधारण महत्त्व आहे. सध्याच्या इंग्रजी युगात विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण शिकविण्याची गरज भासत आहे. स्पर्धा परीक्षेतील मेरिट फिरवणारा मराठी व्याकरणाचा विषय अत्यंत सोप्या भाषेत शिकवून विद्यार्थ्यांचा अधिकारी होण्याच्या स्वप्नातील अडसर दूर करून देण्याचे काम सोलापुरातील एक शिक्षक करत आहेत. मराठी व्याकरणाचा कानमंत्र लक्षात देऊन हजारो विद्यार्थीना अधिकारी करणाऱया स्पर्धा परीक्षक मार्गदर्शक शिक्षकांचे नाव सुभाष हांडगे असे आहे.

सुभाष हांडगे शहरातील शेळगी परिसरातील रहिवासी. एम.ए. बी.एड.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८१-८२ साली सहशिक्षक म्हणून धोत्री येथील श्री भगवती गौरीमाता प्रशालेत रुजू झाले. अत्यंत शिस्तप्रिय शिक्षक हीच त्यांची अोळख. या शाळेतील मराठीच्या शिक्षकांनी राजीनामा दिला. त्यामुळे मराठी विषय शिकवण्याची जबाबदारी सरांवर अाली. हांडगे सर हे मूळचे भूगोलाचे शिक्षक. येथील विद्यार्थी हे कानडी भाषिक असल्यामुळे त्यांना मराठी हा विषय अवघड जायचा. इंग्रजी गणित विषयात पास होणारा विद्यार्थी दहावीत मराठी विषयात नापास व्हायचा. सरांनी या नापासाचे मूळ कारण शोधून काढून त्यावर रामबाण उपाय देखील सुचविला. व्याकरणाचे प्रश्न विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळवून देतो. याची त्यांना कल्पना आली.

सरांनी स्वतः त्याचा सखोल अभ्यास केला. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत ते जादा तास घेत विद्यार्थ्यांकडून व्याकरणाचा विषय तोंडपाठ करून घेऊ लागले. गुरुजींचा धाक पाहून विद्यार्थी देखील अभ्यास करू लागले. त्यानंतर प्रशालेचा निकालही चांगला १०० टक्के अाला. आपला विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावा यासाठी ते रात्रंदिवस मेहनत घेतली. प्रसंगी शाळेतच मुक्काम करायचे. सतत मराठी शिकवण्यामुळे श्री हांडगे मराठी विषयात पारंगत झाले. सरांची मराठी व्याकरण शिकविण्याची कीर्ती जगभर पोहचली. ३२ वर्षं सेवा देऊन २००७ साली ते जगद्गुरू रेवण सिद्धेश्वर प्रशाला लिंबी चिंचोळी या शाळेतून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले.

पंधरा वर्षांपासून देतात व्याकरणाचे धडे

निवृत्तीनंतर काय करायचे असाही त्यांना प्रश्न पडू लागला. याच दरम्यान शहरात स्पर्धा परीक्षेचा मराठी व्याकरण शिकवण्याचे तज्ञ शिक्षक नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेतही मराठी व्याकरणावर अनेक प्रश्न विचारले जातात म्हणून विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी व्याकरणाचे धडे देण्यास सुरुवात केली. पैशाचा विचार न करता विद्यार्थी देतील तेवढ्या पैशात ते व्याकरणातले बारकावे शिकू लागले. मराठी व्याकरणाच्या कितीतरी बॅचेस मोफत घेतल्या. त्याचा फायदा गरीब विद्यार्थी घेत अापले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण केले.

महाविद्यालयीन जीवनापासून वापरतात गांधी टोपी

श्री. हांडगे यांचा विजार, पायजमा आणि डोक्यावर गांधी टोपी असाच पोशाख आहे. महाविद्यालय जीवनापासून ते गांधी टोपी वापरतात. या पोशाखात त्यांनी कधीच बदल केला नाही.
पहाटे चार वाजल्यापासून त्यांच्या दिनचर्येला सुरुवात होते. वयाच्या ७२ वर्षीही ते न थकता अाजही दहा बारा तास अध्यापन करतात. त्यांच्या शिकवण्याच्या शैलीमुळे आजही ते विद्यार्थ्यांत लोकप्रिय शिक्षक आहेत. त्यांच्या हाताखाली शिकून बाहेर पडलेला विद्यार्थी आम्ही सरांमुळेच घडलो अशी कबुलीही देतात. सरांना स्टडी सर्कल पुणे यांच्याकडून आदर्श स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले अाहे.

हेही वाचा – धक्कदायक:ट्रक व रिक्षाची समोरासमोर धडक;रिक्षातील तिघे जागीच ठार

बापरे! ‘या’ बँकांच्या ग्राहकांना मोठा धक्का; पैसे ठेवणे आणि काढणे दोन्हीला चार्ज, सुट्टी दिवशी एटीएम वापरल्यास..

व्यक्त केली नाराजी

वृत्त आणि अलंकार विद्यार्थ्यांना अवघड जात असल्यामुळे यंदा दहावीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आले. या निर्णयावर  हांडगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमात वृत्त आणि अलंकार ठेवण्यात आले तर मग शालेय अभ्यासक्रमातून का काढले? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. व्याकरण हे मराठी भाषेचे सौंदर्य आहे ते विद्यार्थ्यांना कळलेच पाहिजे असेही हांडगे म्हणाले.

litsbros

Comment here