सरकारनामासोलापूरसोलापूर जिल्हा

जिल्ह्यातील आठवडा बाजार सुरु;जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जिल्ह्यातील आठवडा बाजार सुरु;जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

सोलापूर: कोरोनामुळे अनेक नियम लावण्यात आले होते.त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जे आठवडी बाजार भरत होते.ते देखील बंद करण्यात आले होते.परंतु आता  कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन 2005 अन्वये प्राप्त अधिकारानुसार शहर पोलीस आयुक्तालयची हद्द वगळून सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारचे आठवडा बाजार व जनावरांचे बाजार दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ पासून भरण्यास परवानगी देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी निर्गमित केले आहे.

सदर आठवडा बाजारामध्ये कोविड-१९च्या अनुषंगाने शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यात येते का याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशानाने नियत्रंण ठेवावे. तसेच आठवडा बाजारात स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशानाने दिलेल्या अटींचे व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

आठवडी बाजाराशी संबधित असणाऱ्या आस्थापनांनी बाजार भरण्याच्या ठिकाणी मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन याबाबत नियमांचे पालन करावे. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – रावगाव व पांडे येथे करमाळा तालुका न्यायालय विधी सेवा समिती मार्फत “आझादी का अमृत महोत्सव” कार्यक्रम संपन्न

राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून लूटमार करणाऱ्या टोळीला अटक;सोलापूर ग्रामीण एलसीबीची धडाकेबाज कामगिरी

तसेच शासनाने व जिल्हा प्रशासनाने कोविड-१९ च्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशानाने नियंत्रण ठेवावे. सदरचे आठवडा बाजार स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार सुरु राहण्यास परवानगी असेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

litsbros

Comment here