करमाळा

सोगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे : गावावर नजर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे : गावावर नजर

केतूर (राजाराम माने) : सोगाव (ता.करमाळा) ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात आले आहेत,गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व गावच्या विकास कामामध्ये अडथळा ठरनार्या काही अपप्रवृत्त गोष्टीवर चोवीस तास नजर ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात आले आहेत, त्याचे प्रक्षेपण हे ग्रामपंचायत कार्यालय येथे होत आहे.

भविष्यात ही ईतर ठिकाणी कँमेरे बसविण्यात येणार आहेत अशी माहिती सोगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पलता गोडगे यांनी दीली. सोगाव ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक संपूर्ण पश्चिम भागातील गावांमधून होत असून ईतर गावातील ग्रामपंचायतीनी याचा आदर्श घ्यायला हवा असे मत पश्चिम भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


या आदी कोरोना विषाणूजन्य रोगाच्या पाश्वभूमीवर मोफत सँनिटायजर,आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप,थर्मल स्कॅनिंग,रक्तदान शिबीर,असे स्तुत्य उपक्रम गावातील नागरीकांची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत राबविण्यात आले आहेत.

बापरे! पिकांवरील कीटकनाशक फवारणीतून ३६ शेतकऱ्यांना विषबाधा

सोलापुरात टेली आयसीयूचे ऑनलाईन लोकार्पण ;कोरोना रुग्णांचा मृत्यू दर कमी होण्यास होणार मदत-आरोग्यमंत्री राजेश टोपे

उंदरगाव येथे कृषीदूताकडून द्राक्षे बागायतदारांना मार्गदर्शन

“त्या व्यक्तीचे आणि एका महिलेचे नग्न फोटो माझ्याकडे होते, मी ते पक्षातील वरिष्ठांना दाखवले; एकनाथ खडसे यांचा खळबळजनक दावा

litsbros

Comment here