आरोग्यकरमाळाक्राइम

धक्कादायक- सीना कोळगाव धरणात ‘त्याने’ विष टाकले.? मृत माशांचा पडतोय खच, पाण्याचा बदलला रंग, जनतेच्या जीवाला धोका; डोमगाव ग्रामस्थांची जलसंपदा विभागाकडे तक्रार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक- सीना कोळगाव धरणात ‘त्याने’ विष टाकले.? मृत माशांचा पडतोय खच, पाण्याचा बदलला रंग; डोमगाव ग्रामस्थांची जलसंपदा विभागाकडे तक्रार

जेउर (प्रतिनिधी)- मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था भोत्रा यांचे संचालक बालाजी सल्ले यांनी करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील सिना कोळेगाव प्रकल्पातील जलाशयात विष टाकल्याची तक्रार परंडा पोलीस निरक्षक यांच्याकडे डोमगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

करमाळा माढा न्यूजचा विशेष रिपोर्ट

विषबाधा झाली असेल तर डोमगाव पाणी पुरवठा व परंडा पाणीपुरवठा तसेच करमाळा तालुक्यातील कोळगाव पाणीपुरवठा यांना तसेच करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील प्रकल्प क्षेत्रातील जनावरे व शेतकरी पाणी पितात. त्यांना विषबाधेचा धोका संभवतो सध्या विषबाधा झाल्याने कोळगाव प्रकल्पातील पाणी अक्षरशा हिरवेगार दिसत आहे .

सिना कोळेगाव प्रकल्पातील मासेमारीचा ठेका मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था भोत्रा (ता. परंडा) या संस्थेचे चेअरमन बालाजी सल्ले ( रा. भोत्रा ता. परंडा ) यांनी घेतलेला असून जून अखेर एक वर्ष पुर्ण होणार आहे . कोळंबी सारखी महागडी मासाचे बीज जलाशयात सोडलेले असून आशा प्रकारचा माशाचे बीज सोडल्यापासून ६ महिन्याच्या आत उत्पन्न होते व मार्केटला जाणे भाग असते.परंतु सध्या कोरोना महामारीमुळे सर्व मार्केट बंद आहे .

मृत माशांचा असा खच पडत आहे

अखेर मुलीनेच दिला आईच्या चितेला भडाग्नी; करमाळा तालुक्यातील घटना

बिग ब्रेकिंग:सोलापूर जिल्ह्यात १० दिवसांचा पुन्हा लॉकडाऊन;काय आहे नियमावली वाचा- सविस्तर

 

त्यामुळे येथील मासे विषबाधीत करून मारून शासकीय स्तरावरील योजना व विमा याचा लाभ मिळविण्यासाठी या संस्थेने जलाशय वीषबाधीत केलेले आहे. मासे मोठया प्रमाणात मेलेले आहेत. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या डोमगाव पाणीपुरवठा व परंडा पाणीपुरवठा तसेच करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील कोळगाव धरणावरील असणारे छोटे-मोठे पाण्याचे प्रकल्प यांना धोका संभवतो.

पाण्यावर आलेला तवंग

तसेच प्रकल्प क्षेत्रातील जनावरे व शेतकरी पाणी पितात. त्यांना विषबाधेचा धोका असून या संस्थेच्या चेअरमनवर गुन्हा दाखल करावा.

असे निवेदन ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी परंडा पोलीसात दिले आहे . निवेदनावर बाबुराव काळे, हरिश्चंद्र मिस्किन, जोतीराम मिस्कीन, बाबासाहेब गायकवाड, विलास काळे, किरण शिंदे, ज्ञानेश्वर चव्हाण, नितिन गायकवाड, आशोक चव्हाण, प्रशांत खैरे, सरपंच महादेव पोफळे आदींची स्वाक्षरी आहे .

शासकीय योजना व विमा योजना याचा लाभ मिळविण्यासाठी पाण्यात विषबाधा करून मासे मारण्याचा संशय असल्याने ग्रामपंचायत डोमगाव व ग्रामस्थ यांनी तक्रारी अर्ज दिला असल्याने पाण्यामुळे विषबाधा होऊन अन्य जीवीतास धोका होऊ नये . याची दक्षता घ्यावी . तसेच तहसिलदार, मुख्याधिकारी,जिल्हा अधीक्षक व जलसंपदा विभाग व सिना कोळेगाव प्रकल्प परंडा यांना कळवावे व उपाययोजना करावी .आम्ही आमच्या स्तरावर चौकशी करीत आहोत . – सपोनी बी.बी. जगताप परंडा पोलीस ठाणे

डोमगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी केलेले आरोप खोटे आहेत . कोणताही वीमा किंवा शासकीय योजना मिळत नसते . मी कोणतीही विषबाधा केलेली नाही .५ वर्षांसाठी मत्स्य ठेका आहे .घेवून ६ महिने झाले आहेत . मासे मरुन पडत असल्याने मोठे नुकसान झालेले आहे . वातावरणातील बदल , अति तापमान व साठलेले दुर्गंधीयुक्त पाणी यामुळे मासे मरण्याचे कारण असावे . पाणी तपासणी व घटनास्थळ पंचनामा केला आहे . त्यामुळे चौकशी अंती खरे -खोटे निष्पन्न होईल
– बालाजी सल्ले चेअरमन मत्सय व्यवसाय सहकारी संस्था, बोत्रा.

litsbros

Comment here