करमाळा

आनंदवार्ता- अखेर सिना कोळेगाव धरण शंभर टक्के भरले; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आनंदवार्ता- अखेर सिना कोळेगाव धरण शंभर टक्के भरले; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

करमाळा (प्रतिनिधी); चालू वर्षी उजनी धरण यापेक्षा कोळगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज रोजी दिनांक 28 सप्टेंबर रोजी शंभर टक्के धरण भरले असून धरण भरल्यामुळे सीना-कोळेगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण पसरले आहे.

उस्मानाबाद सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर विशेषता करमाळा व परांडा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या तसेच करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील वरदायिनी ठरलेल्या सिना कोळेगाव प्रकल्प आज शंभर टक्के क्षमतेने भरले आहे.

धरण शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरल्याने आज पहाटे पाच वाजता धरणातील दोन दरवाजे उघडले आहे दोन दरवाजे उघडल्याने त्यातील पाणी धरण परिसरातील खालील गावांना सोडण्यात आले आहे.

हेही वाचा- बिग ब्रेकिंग:आरोग्य विभागाच्या परीक्षा ‘या’ तारखेला होणार;आरोग्यमंत्री राजेश टोपे यांंनी केेली घोषणा

महिलेचे गंठन लंपास; करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल

धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने परांडा व करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्यातरी मिटला असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी आनंदित दिसत आहे

litsbros

Comment here