जिल्हास्तरीय धावणे क्रीडा स्पर्धेत नेरले शाळेच्या शुभम काळेला उपविजेतेपद
करमाळा प्रतिनिधी – दि. ८ जानेवारी २०२५ रोजी माढा येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,नेरले शाळेचा विद्यार्थी शुभम शिवाजी काळे याने १०० मीटर व २०० मीटर लहान गट मुले धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला असून त्याने स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले आहे.शाळेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
हेही वाचा – हिवरे येथील तरुणाने वाढदिवसानिमित्त केला देहदानाचा संकल्प.. स्तुत्य उपक्रम
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर,श्री.कसबे सर,श्री.मोरे सर,श्री.मनेरी सर,श्रीम.आडेकर मॅडम,श्री.सय्यद सर,श्री.सूर्यवंशी सर व श्री.दिपक ओहोळ सर यांनी शुभमचे अभिनंदन केले.
त्याच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.