श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
केम प्रतिनिधी – श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन आणि पुष्पहार अर्पण ज्येष्ठ पत्रकार राहुल रामदासी यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय व्यवस्थापन समिती सदस्य हरिभाऊ तळेकर यांनी केले पुष्प आणि पुष्पहार अर्पण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत तळेकर सर, उपाध्यक्ष पल्लवी सचिन रणशृंगारे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गणेश तळेकर, सचिन रणशृंगारे यांनी केले.
इयत्ता नववी क मधील विद्यार्थिनी सई सोमेश्वर कांबळे हिने बौद्ध प्रार्थना म्हटली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती प्रशालेतील सहशिक्षक जी .के जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना दिली तसेच उपस्थितांचे मने जिंकली.
हेही वाचा – श्रीमती शगुप्ता हुंडेकरी राज्यस्तरीय क्रांतिज्योती पुरस्काराने पुणे येथे सन्मानित
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत तळेकर उपाध्यक्ष पल्लवी सचिन रणशृंगारे उपाध्यक्ष गणेश तळेकर, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य हरिभाऊ तळेकर, राहुल रामदासी, सचिन रणशृंगारे यांची विशेष उपस्थिती होती महापरिनिर्वाण दिनाचे सूत्रसंचालन के.एन वाघमारे सर यांनी केले यावेळी मुख्याध्यापक कदम एस.बी सर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.