श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी
स्कॉलरशिपधारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
केम प्रतिनिधी –
श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी आणि इयत्ता आठवी स्कॉलरशिपधारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
सुरुवातीला शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याला वंदन केले.गुरुपौर्णिमेचे महत्त्व तसेच जीवनात गुरु शिवाय दिशा दाखवणारा कोणीही नाही असे विचार प्रशालेतील शिक्षक जी.के जाधव सर यांनी व्यक्त केले.

गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून इयत्ता आठवी स्कॉलरशिपधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.इयत्ता आठवी कु.करुणा विठ्ठल लेंडे,कु.संस्कृती प्रमोद दीक्षित,अनुष्का राजकुमार होरणे,इयत्ता पाचवी स्कॉलरशिप धारक विद्यार्थी आदित्य कमलेश जांभळे या सर्व स्कॉलरशिपधारक विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशालेतील जेष्ठ शिक्षक बी.व्ही सांगवे सर,पर्यवेक्षक गीते सर,आठवी स्कॉलरशिप प्रमुख श्री एम.एम पोतदार सर श्री टि.व्ही पवार सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोरोनात अनाथ झालेल्या बालकांना जगदीशब्द फाउंडेशनचा आधार; सलग चौथ्या वर्षी शैक्षणिक साहित्य वाटप
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते गौरव नाईकनवरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव ट्रेडर्स कडून विद्यार्थ्यांना दप्तरे वाटप करण्यात आली.श्री एम.एम पोतदार सर यांनी गौरव नाईकनवरे पाटील यांचे प्रशालेतर्फे आभार मानून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
गुरुपौर्णिमा आणि आठवी स्कॉलरशिपधारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन जी.के जाधव सर यांनी केले.
माननीय मुख्याध्यापक एम.डी बेले सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु पौर्णिमा आणि इयत्ता आठवी स्कॉलरशिपधारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.





































