श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा याविषयी व्याख्यान संपन्न
केम प्रतिनिधी – श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी ग्रामीण भागात विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर अतिशय उदबोधक असे व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून याच कॉलेजची माजी विद्यार्थिनी कु. प्रगती वसंत तळेकर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अमोल तळेकर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री माधव बेले यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमात कु.प्रगती तळेकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये कला शाखेचे असणारे महत्त्व सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील सध्याच्या या स्पर्धेच्या जगात स्पर्धा परीक्षेमध्ये आज चमकत आहेत. श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून घेतली जाते. आजच्या या काळात खेड्यातील विद्यार्थ्यांनी नवनवीन आव्हानाला धाडसाने सामोरे गेले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रा.अमोल तळेकर यांनी या स्पर्धा परीक्षेच्या युगात क्रीडा क्षेत्राचे असणारे महत्त्व सांगून नियमित व्यायाम व मैदानी सराव करण्यासाठी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री माधव बेले यांनी श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजच्या या नवोपक्रमाचे कौतुक केले. या ज्युनियर कॉलेजमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्वाला आकार देण्याचे काम केले जाते असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात कु.प्रगती वसंत तळेकर यांची ICDS मध्ये नेमणूक झाल्यामुळे श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजच्या वतीने त्यांचा सन्मानचिन्ह, ग्रंथ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात तिचे करिअर घडवणारे तिचे मार्गदर्शक प्रा. अमोल तळेकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

याच कार्यक्रमांमध्ये शालेय समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर यांच्या वतीने यांनी आपल्या आई कै.कमल प्रल्हाद तळेकर यांच्या स्मरणार्थ श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मधील गरजू विद्यार्थिनीसाठी पाच गणवेशांचे वाटप केले.
या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा.डॉ. संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे, प्रा.एस.के.पाटील, प्रा.सतीश बनसोडे यांनी सहकार्य केले. यावेळी इयत्ता अकरावी व बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





































