श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

केम प्रतिनिधी –  श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन आणि पुष्पहार अर्पण .प्राचार्य एस.बी कदम सर यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण ज्येष्ठ शिक्षक डी.एन तळेकर सर यांच्या हस्ते करण्यात आले डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती जी.के जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितली इयत्ता 10 वीतल विद्यार्थी पृथ्वीराज तळेकर, स्वरुप रायचूरे यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी सुरेख भाषणे तसेच इयत्ता 5 वी ते 10 विद्यार्थ्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी भाषणे केली.

हेही वाचा – जालना तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेचा करमाळा वंचित बहुजन युवा आघाडीने केला जाहीर निषेध

करमाळा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांनी टँकर साठी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल करा: मा.आ.नारायण पाटील यांचे आवाहन

शिक्षक दिनाचे सूत्रसंचलन  पी.डी कोंडलकर सर यांनी केले. आज शालेय अध्यापनाचे कामकाज इयत्ता 10 वीतल विद्यार्थ्यांनी केले या वेळी इयत्ता 10 वीतल विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून श्रुती तळेकर आणि पर्यवेक्षक सानवी तळेकर यांनी कामकाज बघितले शिक्षक‌ दिना निमित्त सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला प्राचार्य एस.बी कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line