श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे  स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे  स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

केम प्रतिनिधी – श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण केम गावचे सरपंच सौ.सारिका प्रविण कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माननीय दिलीप दादा तळेकर,उपसरपंच सौ. अनवर रमजान मुलानी,श्री राहूल आबा कोरे, श्री अच्युत काका पाटील, श्री महावीर आबा तळेकर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर, उपाध्यक्ष श्री गणेश तळेकर, सौ पल्लवी सचिन रणशृंगारे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री सचिन रणशृंगारे , श्री विजयकुमार तळेकर, ज्येष्ठ पत्रकार राहुल रामदासी, श्री धनंजय ताकमोगे, सौ सलमा झारेकरी, सौ.अमृता दोंड , श्री दादासाहेब गोडसे अध्यक्ष श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट, श्री उत्तरेश्वर देवस्थान विश्वस्त श्री मनोज कुमार सोलापूरे,श्री उत्तरेश्वर देवस्थान विश्वस्त तथा सदस्य मोहन दोंड,श्री बाळासाहेब भोसले,विष्णुपंत अवघडे ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह ओहोळ ग्रामपंचायत सदस्य ,वि.वि का सोसायटी चेअरमन बाळासाहेब म्हैत्रे, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष श्री सागर दोंड ,रणदिवे गुरुजी,केम चौकी तील सर्व पोलीस अधिकारी,तलाठी भाऊसाहेब सर्कल, प्रहारचे तालुकाध्यक्ष श्री संदीप तळेकर,श्री सागर कुरडे ग्रामपंचायत सदस्य, पुष्पा शिंदे ग्रामपंचायत सदस्य केम,श्री किरण तळेकर,श्री सुलतान मुलानी,श्री आकाश भोसले ग्रामपंचायत सदस्य,श्री रघुनाथ मेजर तळेकर,श्री सिराज मोमीन, कुंकू कारखानदार हरिदास शिंदे, गोरख खानट ,प्रशालेतील माजी शिक्षक श्री डी एन तळेकर सर,श्री पी. डी कोंडलकर सर,श्री बी.एस तळेकर सर,के आर सुरवसे सर तसेच केम पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व उपस्थितांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कदम एस.बी सर यांनी केले.15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी लॉन्ग मार्चिंग परेड करून उपस्थितांचे मने जिंकली.ध्वजारोहण झाल्यानंतर प्रशालेत तर्फे विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.शालेय पोषण विभागाचे श्री घुगे एस.एम सर,श्री टि.व्ही पवार सर प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांच्या भोजनाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.

हेही वाचा – वक्ते जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचा इस्लामपुरात गौरव; लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

यशकल्याणीच्या व्यासपीठावर जागतिक किर्तीचे वक्ते निर्माण होतील – प्रा. गणेश करे-पाटील.

विद्यार्थ्यांच्या गोड खाऊ साठी श्री कुलकर्णी आणि कलीम भाई यांनी शंभर रुपये प्रशालेला दिले.श्री शिवाजी उत्तरेश्वर तळेकर यांनी 700 लाडू विद्यार्थ्यांना दिले.15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री के. एन वाघमारे सर यांनी केले आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line