श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

केम प्रतिनिधी – वार:-गुरूवार दिनांक 05/09/2024 रोजी श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सुरुवातीला शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन आणि पुष्पहार अर्पण प्रशालाचे मुख्याध्यापक श्री कदम एस बी सर यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर ,उपाध्यक्ष सचिन रणशृंगारे यांच्या हस्ते करण्यात आले.शिक्षक दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रशालेचे प्रशासन आणि अध्यापनाचे कार्य पाहिले.

इयत्ता दहावीचे विद्यार्थ्यांपैकी मुख्याध्यापक म्हणून भाग्य विजय दोंड,पर्यवेक्षक कृष्णा गावडे तसेच इयत्ता दहावीचे विद्यार्थ्यांनी अध्यपनाचे कामकाज उत्कृष्टरित्या सांभाळले.इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा पेन आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर,उपाध्यक्ष सौ. पल्लवी सचिन ,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य राहुल रामदासी,श्री लक्ष्मण गुरव,सौ अमृता दोंड यांची विशेष उपस्थिती होती.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर,उपाध्यक्ष सौ पल्लवी सचिन रणशृंगारे,श्री सचिन रणशृंगारे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री राहूल रामदासी, श्री लक्ष्मण गुरव, सौ.अमृता दोंड यांनी शालेय व्यवस्थापन समितीतर्फे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सूत्रसंचलन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी वसुंधरा पाटील, आणि प्रतीक्षा कळसाईत यांनी केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कदम एस.बी सर यांनी सुयश क्लासेस चे संस्थापक तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर यांचा सत्कार करण्यात आला.शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री गणेश तळेकर यांचे सुपुत्र तथा प्रशालेचा विद्यार्थी विश्वजीत गणेश तळेकर याने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन सर्वांची मने जिंकली.शिक्षक दिनानिमित्त इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांनी भाषणे केली.

हेही वाचा – मुली व महिलांची सुरक्षा करणे आपली जबाबदारी – ए.पी.आय नेताजी बंडगर उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयात गेस्ट लेक्चरचे आयोजन

करमाळा येथे स्व.लिलाताई दिवेकर स्मृतीदिनानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा संपन्न; क्लिक करून वाचा यशस्वी विद्यार्थ्यांची नावे

शिक्षक प्रतिनिधी श्री जी के जाधव सर यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच जीवनात शिक्षकांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री के.एन वाघमारे सर यांनी उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीचे आणि इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचे आभार मानले.माननीय मुख्याध्यापक कदम एस बी सर यांच्या मार्गादर्शनानुसार शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line