श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
केम प्रतिनिधी – श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सुरूवातीला शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन आणि पुष्पहार अर्पण ए.पी.ग्रुपचे अध्यक्ष- अच्युत काका पाटील यांनी केले.
राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सौ पल्लवी सचिन रणशृंगारे यांनी केले स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण महावीर आबा तळेकर यांनी केले.
या जयंती सोहळ्याला,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत तळेकर सर, उपाध्यक्ष-गणेश तळेकर, उपाध्यक्ष सचिन रणशृंगारे, (शालेय व्यवस्थापन समिती सदस्य )-धनंजय ताकमोगे, विजयकुमार तळेकर-(शालेय व्यवस्थापन समिती सदस्य),
विष्णू पंत अवघडे(ग्रामपंचायत सदस्य), सागर कुर्डे (ग्रामपंचायत सदस्य), बापूराव तळेकर,ज्येष्ठ पत्रकार श्री राहुल रामदासी,श्री.शेळके,श्री.सुरवसे सर यून्नूस मुलाणी,श्री दत्तात्रय खुपसे, श्री शरद पालवे,श्री लक्ष्मण गुरव, सौ.झारेकरी मॅडम, सौ.दोंड मॅडम या मान्यवरांची उपस्थिती होती.स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती निमित्त केम पंचक्रोशीत प्रभातफेरी काढण्यात आली.शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांचा विजय असो तसेच जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी केम परिसर दुमदुमला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री के एन वाघमारे सर यांनी केले.या जयंती सोहळ्याला केम पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.