श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी ओझोन आणि जागतिक हवामान बदल या विषयावर व्याख्यान संपन्न

श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी
ओझोन आणि जागतिक हवामान बदल या विषयावर व्याख्यान संपन्न

केम- श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी ओझोन आणि जागतिक हवामान बदल या विषयावर भूगोल अभ्यासक प्रा.सतीश बनसोडे यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री सुभाष कदम हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


यावेळी प्रा.सतीश बनसोडे यांनी ओझोन वायूचा थर कमी होत चाललेला आहे त्यामुळे जीवसृष्टीवर त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम जाणवत आहेत. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे ही जशीच्या तशी पृथ्वीवर येऊन जीवसृष्टीला अपायकारक ठरत आहेत. त्यामुळे ओझोन वायूला महत्त्वाचे स्थान देऊन पुढील पिढी वाचवण्यासाठी, प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज बनलेली आहे असे मत प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्याचे महत्व विषद करून विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा – ब्रहमा चैतन्य विघागिरी आनंदगिरी महाराज यांच्या १८व्या पुण्यतिथी निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयाच्या 24 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुभाष कदम यांनी या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना ओझोन वायूचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे आभार कु. मोनाली मोटे या विद्यार्थिनीने मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा.डॉ.संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे, प्रा.एस.के. पाटील यांनी परिश्रम घेतले.

karmalamadhanews24: