श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम याठिकाणी नवीन शैक्षणिक धोरण-२०२० स्कूल कनेक्ट अभियान कार्यशाळा उत्साहात संपन्न

श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम याठिकाणी नवीन शैक्षणिक धोरण-२०२० स्कूल कनेक्ट अभियान कार्यशाळा उत्साहात संपन्न

केम- श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम याठिकाणी नवीन शैक्षणिक धोरण-२०२० स्कूल कनेक्ट अभियान कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि भारत महाविद्यालय जेऊर आयोजित या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारत महाविद्यालय जेऊर येथील इतिहास विभागप्रमुख डॉ.शिवाजीराव वाघमोडे , प्रा. टी.एच.आघाव हे उपस्थित होते.


या कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर प्रमुख व्याख्याते डॉ. शिवाजी वाघमोडे यांनी नवीन शैक्षणिक धोरण समजावून सांगताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या संधी सांगितल्या. या नव्या शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रमासोबतच शालेय नवोपक्रमांना देखील महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.


श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम येथील विद्यार्थ्यांनी राबवलेल्या डॉ. बापूजी साळुंखे ऑक्सिजन पार्कचे त्यांनी पाहणी करुन कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री सुभाष कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास नूतन ज्युनियर कॉलेज केम येथील विद्यार्थी , श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – करमाळ्याचे सुपुत्र उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार जाहीर

जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या विकास निधीतून वीट येथे ‘इतक्या’ लाखांच्या विकास कामाचे उद्घाटन

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.किरण सलगर यांनी केले. या कार्यक्रमास प्रा.डॉ.संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे, प्रा.एस.के.पाटील, प्रा.सतीश बनसोडे तसेच नूतन ज्युनिअर कॉलेजचे प्रा. विष्णू शेंडगे उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line