श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम येथे ‘एक राखी आम्ही लावलेल्या झाडासाठी – एक राखी आपल्या सैनिकासाठी ‘ हा पर्यावरणीय उपक्रम उत्साहात साजरा

श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम येथे ‘एक राखी आम्ही लावलेल्या झाडासाठी – एक राखी आपल्या सैनिकासाठी ‘ हा पर्यावरणीय उपक्रम उत्साहात साजरा

केम(प्रतिनिधी) – श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी ‘ “एक राखी आम्ही लावलेल्या झाडासाठी – एक राखी आपल्या सैनिकासाठी” हा पर्यावरणपूरक उपक्रम आज उत्साहात संपन्न झाला.यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्ष  दयानंद तळेकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री सुभाष कदम हे होते.


या कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी या कॉलेजमधील विद्यार्थिनींनी गेल्या वर्षी लावलेल्या जवळपास १०० झाडांची पूजा करून त्या झाडांना राख्या बांधल्या.

तसेच उपस्थित विद्यार्थी बांधव, प्राध्यापकवर्ग व सन्माननीय पाहुण्यांना देखील राख्या बांधल्या. यावेळी आपल्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना राख्या पाठवण्यात आल्या.

वृक्षारोपण करणे, वृक्ष संवर्धन करणे हे महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य आहे. अशा उपक्रमातून आपण स्वतः लावलेल्या झाडांना आपला भाऊ मानून त्याची सर्वतोपरी काळजी घेणे हा संदेश यावेळी देण्यात आला.

हेही वाचा – उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम येथे ‘एक ऋणानुबंधीय संवाद – माजी सैनिकाशी’ हा अनोखा उपक्रम संपन्न

मोठी बातमी! उजनीतून पंढरपूर , सोलापूरसाठी पाणी सोडणार…

या कार्यक्रमास प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे , प्रा. संतोष साळुंखे , प्रा.संतोष रणदिवे, प्रा. सतीश बनसोडे हे उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी केले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line