श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रूक मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रूक मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

माढा प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या,श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती, महिला मुक्तीदिन व बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.उपळाई बुद्रुकच्या सरपंच सुमनताई माळी मॅडम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. डॉ. नम्रता नकाते मॅडम,समाजसेविका शशिकला नकाते मॅडम व शिक्षणप्रेमी दिपाली देशमुख मॅडम या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. उपळाई बुद्रुक च्या सरपंच  सुमनताई माळी मॅडम यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. नम्रता नकाते मॅडम,समाजसेविका शशिकला नकाते मॅडम व विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख शब्बीर तांबोळी सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना शब्दरूपी उजाळा दिला तसेच बालिका दिनाचे महत्त्व सांगितले.

याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध ऐतिहासिक स्त्रियांची पात्रे साकारली होती.तसेच विद्यालयातील विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

हेही वाचा – उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयात क्रीडा सप्ताह संपन्न

लेखक जगदीश ओहोळ यांनी घेतली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची भेट; ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक दिले भेट

यावेळी विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक दशरथ देशमुख साहेब,ज्येष्ठ शिक्षक नागेश बोबे सर,सांस्कृतिक विभागप्रमुख शब्बीर तांबोळी सर,ज्येष्ठ विज्ञानशिक्षक  मकरंद रिकिबे सर,विद्यालयातील महिला शिक्षिका सुनिता बिडवे मॅडम, शिल्पा खताळ मॅडम,शबनम आतार मॅडम, अश्विनी नाईकवाडी मॅडम,ऐश्वर्या फडतरे मॅडम,कोमल गाडे मॅडम,दमयंती शिंदे मॅडम यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व उपळाई बुद्रुक मधील बहुसंख्य महिला भगिनी आदी उपस्थित होते. समृद्धी कुलकर्णी,सिद्धी शिंदे,श्रुती देवडकर व गौरी शिंदे या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line